घरदेश-विदेशसुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत चार नक्षलवादी ठार, शोधमोहीम सुरूच

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत चार नक्षलवादी ठार, शोधमोहीम सुरूच

Subscribe

ही चकमक मिरातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोमरा या जंगल परिसरात झाली.

भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत भारतीय जवानांना चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील बिजापूर येथे ही घटना घडली. याचसंदर्भांत माहिती देताना बिजापूरचे एसपी अंजनेय वार्ष्णेय यांनी सांगितले की, ही चकमक मिरातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोमरा या जंगल परिसरात झाली.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही
दरम्यान यावेळी घटनास्थळावरून काही शस्त्रे शुद्ध जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. काल २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांविरोधात मोहिमेवर गेले होते. त्याचवेळी शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांमध्ये चकमक झाली.

- Advertisement -

हे ही वाचा – श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या घरी आलेली ‘ती’ मुलगी नेमकी कोण? पोलिसांकडून तपास सुरु

पोमरा जंगलात सर्च ऑपरेशन
DVCM मोहन कडती, DVCM सुमित्रा, Matwara LOS कमांडर रमेश आणि 30-40 नक्षलवादी जंगलात असल्याची महिती मिरातूर पोलिस ठाणे क्षेत्रातील पोमरा येथे नोंदवली आहे. त्यावर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आणि सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोमराच्या जंगलात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. अजूनही ही शोध मोहीम सुरूच आहे. DRG, STF आणि KERIP फोर्स यांच्या संयुक्त कारवाईमुळे हे यश मिळाले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘ED-CBI मला सोपवा, अर्धी भाजपा तुरुंगात जाईल’; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -