‘ED-CBI मला सोपवा, अर्धी भाजपा तुरुंगात जाईल’; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

देशभरात आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या असून, सर्व राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. देशातील गुजरात, हिमाचल आणि दिल्ली या राज्यांमध्ये पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठीची मुख्य लढत भाजपा, आप यांच्यात असणार आहे.

गुजरात, हिमाचल आणि दिल्लीमध्ये कोणते पक्ष विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ वर्षापासून असणारी भाजपची सत्ता हिसकावण्यासाठी ‘आप’ने चांगलीच कंबर कसली आहे. अशातच आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “विरोधकांना राष्ट्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जात आहे. तरीही भाजपच्या हाताला काही लागत नाही. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल”, अशा शब्दांत अरविंद केजरीवालांनी भाजपवर हल्लाबोल केला. (give cbi and ed control for day half of bjp will be in jail says arvind kejriwal)

दिल्ली एमसीडी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी प्रचार मोहिमेवर भर दिला आहे. गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि ती सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपासमोर आम आदमी पक्षाचे आव्हान आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, “आम्ही एमसीडीला गेल्या ५ वर्षांत १ लाख कोटी रुपये दिले, पण भाजपच्या लोकांनी सर्व पैसे हडप केले. या लोकांना मोठा भ्रष्टाचार केला आहे. यांनी थोडंतरी काम केलं असतं तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं असतं”.

“एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, भाजपचे निम्मे लोक तुरुंगात जातील. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, तरीही काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषनं दारू घोटाळा केला, १० कोटी खाल्ल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग १० कोटी रुपये गेले कुठे?”, असा सवाल करत भ्रष्टाचार गुजरातमध्ये मोरबी पूल निर्माणकार्यात झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

देशभरात आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या असून, सर्व राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. देशातील गुजरात, हिमाचल आणि दिल्ली या राज्यांमध्ये पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठीची मुख्य लढत भाजपा, आप यांच्यात असणार आहे.


हेही वाचा – दिल्ली मद्य धोरण प्रकरण : सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, मात्र मनीष सिसोदियांचे नाव नाही