घरताज्या घडामोडीदक्षिणेत 'दह्या'वरून रंगला राजकीय काला, नेमकं काय आहे प्रकरण?

दक्षिणेत ‘दह्या’वरून रंगला राजकीय काला, नेमकं काय आहे प्रकरण?

Subscribe

दक्षिण भारतात दह्यावरून भाषा युद्ध पेटले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दह्याचे नाव बदलण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाच्या भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिले होते. FSSAI या संस्थेने दह्यांच्या पाकिटावर हिंदीत ‘दही’ असा शब्द प्रसिद्ध करण्याचे आदेश दिल्याने दक्षिण भारतीय भडकले आहेत. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सुद्धा या मुद्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहे.

FSSAI च्या या निर्देशानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा हा प्रयत्न आहे. पाकिटावर हिंदी भाषा छापण्याच्या या कृतीतून केंद्राचे इरादे स्पष्ट झाले आहेत. आमच्या राज्यात तामिळ आणि कन्नड भाषेला दुय्यम स्थान देण्याचा हा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. आमच्या भाषेचा जर कोणी अपमान करीत असेल तर त्यांना दक्षिणेतून कायमचे पळवून लावले जाईल, असा इशाराही स्टॅलिन यांनी दिला आहे.

- Advertisement -

कन्नड भाषेत दहीला ‘मोसारू’ आणि तामिळमध्ये ‘तयैर’ म्हटले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आतापर्यंत दह्यांच्या पाकिटावर हीच स्थानिक भाषेतील नावे प्रसिद्ध केली जात होती. परंतू FSSAI या केंद्रीय संस्थेने आपल्या आदेशात या राज्यातील मिल्क फेडरेशन आणि स्थानिक दूध आणि दही निर्मिती संस्थांना पाकिटावर हिंदी भाषेत ‘दही’ असे हिंदीत छापावे असे आदेश जारी केले होते.

- Advertisement -

तामिळनाडूचे डेअरी मिनिस्टर म्हणाले की, राज्यात FSSAI चा निर्देश लागू शकत नाही, त्यांनी दही कपावर पूर्वी प्रमाणेच तयैर असे लिहिले जाईल, असे म्हटले आहे.

FSSAI च्या या निर्देशानंतर दक्षिण भारतात राजकीय आणि स्थानिकांकडून प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर FSSAI ने यू-टर्न घेतला. यासोबतच आज एक नवीन प्रेस रिलीजही जारी करण्यात आली आहे. दही हा शब्द इंग्रजीत Curd असाही लिहिता येईल, असे सुधारित प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच कोणत्याही स्थानिक भाषेचा उल्लेख करू शकता, असंही पत्रकात म्हटलं आहे.


हेही वाचा : कोविड पॉझिटिव्ह असूनही खासदारने ट्रेनमधून केला प्रवास, ३० दिवसांसाठी निलंबित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -