घरताज्या घडामोडी१० वर्षांपासून सत्ता असताना गोवा चकाचक का नाही केला?, संजय राऊतांचा अमित...

१० वर्षांपासून सत्ता असताना गोवा चकाचक का नाही केला?, संजय राऊतांचा अमित शाह यांना सवाल

Subscribe

गोव्यात जास्त बेरोजगारी आहे. लहान राज्य असून जास्त बेरोजगार आहेत. फक्त आश्वासने देऊन चालणार नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वाधिक बेरोजगार आहेत. निवडणुका असल्यामुळे फुलबाजे उडवत असता त्याचा लोकांवर आता परिणाम होत नाही असे संजय राऊतांनी सांगितले.

गोव्यात गेल्या १० वर्षांपासून सत्ता असताना गोवा चकाचक आणि गोल्डन का केला नाही असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे. भाजप नेते अमित शाह यांनी गोव्यात रविवारी प्रचार आणि सभा घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपसाठी गोवा गोल्डन आणि विकास करण्यासाठी असल्याचे अमित शाह म्हणाले. तर गोवा काँग्रेससाठी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असल्याची टीका अमित शाह यांनी केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. तसेच दिल्लीतील नेत्यांना देशाची कामे नसल्यामुळे प्रचारासाठी गोव्यात येतात असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गोव्यातील निवडणूकीबाबत माहिती दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राऊत म्हणाले की, दिल्लीतून नेते येतात घरोघरी जातात देशात इतर कामे नसल्यामुळे प्रचारात येतात. नवीन आश्वासने देतात आणि मग त्या आश्वासनाला भूलुन लोकं मतदान करतात यानंतर येरे माझ्या मागल्या हे गेले ५० वर्षांपासून गोव्यात पाहतो आहे.

- Advertisement -

भाऊसाहेब बांदोडकर आणि शशिकला काकोडकर यांनी सुरुवातीच्या काळात चांगले काम केले. परंतु आता असं वाटत सगळा पैशांचा खेळ आहे. निवडून येणारा माफिया ज्याला पक्ष नाही आहे. कोणाची सत्ता येत असेल मग त्या पक्षात त्याला घेतलं जाते, त्याचे शुद्धीकरण केलं जाते, बलात्कार, भ्रष्टाचार, खून, अपहरण असे गुन्हे ज्यांच्यावर आहेत असे लोक देशाला नितीमत्ता शिकवणाऱ्या पक्षात जातात आणि राज्याच्या राजधानीतून उमेदवार बनतात, देशाने कोणते आदर्श ठेवायचे अशा पक्षाच्या नेत्याकडून काय शिकायचे या देशाने असा प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.

तेव्हा तुम्ही गोवा चकाचक का नाही करु शकला?

दरम्यान संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना म्हणाले की, असे गोल्डन सिल्वहर अशा घोषणा देऊन काय गोल्डन होत नाही. मागील १० वर्षांपासून तुमचे राज्य आहे. तेव्हा तुम्ही गोल्डन आणि चकाचक का नाही करु शकला. असे नारेच पश्चिम बंगालमध्ये दिले होते परंतु लोकांनी ते स्वीकारले नाही. गोव्यातील जनतेचा अभ्यास करावा लागतो. त्यांची मानसिकता फार वेगळी असते. आमचे नातेसंबंध चांगले आहेत. आम्ही बांधले गेलेलो आहोत असं संजय राऊतांनी सांगितले.

- Advertisement -

गोव्यात आश्वासनांचे फुलबाजे चालणार नाहीत

पुलवामा तुमच्या काळात झाला आहे. त्याला तुम्ही जबाबदार असून तुमचे अपयश आहे हे का सांगत नाही. ३७० कलम रद्द केलं त्याचे आम्ही स्वागत केलं आहे. या देशामध्ये ४ कोटी बेरोजगार नव्याने निर्माण झाले आहेत. गोव्यात जास्त बेरोजगारी आहे. लहान राज्य असून जास्त बेरोजगार आहेत. फक्त आश्वासने देऊन चालणार नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वाधिक बेरोजगार आहेत. निवडणुका असल्यामुळे फुलबाजे उडवत असता त्याचा लोकांवर आता परिणाम होत नाही असे संजय राऊतांनी सांगितले.

अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. खाण व्यवसाय बंद पडून १० वर्ष होऊन गेले आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, या खाण व्यावसायिकांचे अनेक प्रश्न संसदेत मांडले आहेत. यावर भाजपकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. केंद्र सरकारने दखल घेतली नाही. केंद्राच्या मंत्र्यांपर्यंत यासाठी गेलो होतो. त्यांनी १० वर्ष का केले नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा : Vishwasghat Diwas : मोदी सरकारने केलेल्या ‘विश्वासघाता’विरोधात आज शेतकरी संघटनांचे आंदोलन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -