घरताज्या घडामोडीGold Price Today: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ मात्र चांदी घसरली

Gold Price Today: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ मात्र चांदी घसरली

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण होताना दिसत होती. पण आज सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीच्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर ट्रेंडच्या अनुषंगाने राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी सोन्याची किंमतीत ३७ रुपयांची वाढून प्रति १० ग्रॅम ५१ हजार ३८९ रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली असली तरी चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीत ९१५ रुपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्रॅम ६१ हजार ४२३ रुपये झाली आहे.

यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, ‘दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमतीमध्ये ३७ रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत १,८९५ डॉलर प्रति ग्रॅम होती.’

- Advertisement -

यामुळे सोन्याची किंमती थोडी वाढली

तपन पटेल पुढे म्हणाले की, ‘डॉलरच्या चढ-उतारांच्या अनिश्चिततेमुळे गुरुवारी सोन्याच्या किंमती वाढल्या. देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक कल आणि अमेरिकी चलनातील कमकुवतपणामुळे रुपया गुरुवारी ६३ पैसे वाढून, प्रति डॉलर ७३.१३वर बंद झाला.’

मागील सत्रात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, बुधवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत २६ रुपयांनी घसरण होऊन प्रति ग्रॅम ५१ हजार ३७२वर पोहोचली होती. तर चांदीची किंमत २०१ रुपयांची घसरून प्रति किलोग्रॅम ६२ हजार २४१वर पोहोचली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मॉडेलचा अतिशहाणपणा; डोळ्यात टॅटू काढल्यानंतर झाली आंधळी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -