घरट्रेंडिंगGoogle CEO सुंदर पिचाई यांच्या वाढदिवसावरून उडाला गोंधळ, गुगलने दाखवल्या दोन तारखा

Google CEO सुंदर पिचाई यांच्या वाढदिवसावरून उडाला गोंधळ, गुगलने दाखवल्या दोन तारखा

Subscribe

रॉयलर्स फॅक्ट बॉक्सनुसार, Google चे CEO सुंदर पिचाई हे मुळचे भारताचे आहेत. त्यांच्या जन्म हा १० जून १९७२ साली तमिळनाडू येथे झाला

आपली जवळची व्यक्ती आपला वाढदिवस एकवेळ विसरेल पण गुगल (Google) आपला वाढदिवस कधीच विसरत नाही. गुगलला सगळ माहिती असत असे आपण नेहमी म्हणत असतो. आपण विसरलो तरी गुगल आपल्याला मित्रमंडळींचा,जवळच्या माणसांचा वाढदिवस बरोबर लक्षात आणून देतो. मात्र गुगल स्वत:च्या CEOचा वाढदिवस विसल्याचे सांगण्यात येतय.  Googleचे CEOसुंदर पिचाई (Sundar Pichai) यांचा वाढदिवस १० जून रोजी असल्याने जगभरातून त्यांना लाखो शुभेच्छा येऊ लागल्या. मात्र त्यांच्या जन्मतारखेत घोळ असल्याचे म्हणत अनेकांनी ट्विटरवर त्यांची जन्मतारिख १० जून नसून १२ जुलै असल्याचे म्हटले आहे. ( Google CEO Sundar Pichai’s birthday sparked controversy, two dates shown by Google)  गुगलनेच सुंदर पिचाई यांच्या वाढदिवसाच्या चक्क दोन तारखा दाखवल्या. नक्की हा घोळ कसा काय झाला? गुगल त्याच्या CEOचा वाढदिवस विसरला का? असा प्रश्न युझर्सना पडला.


सध्या गुगलवर सुंदर पिचाई यांची जन्मतारिख १० जून आणि १२ जुलै दाखलण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. रॉयलर्स फॅक्ट बॉक्सनुसार, Google चे CEO सुंदर पिचाई हे मुळचे भारताचे आहेत. त्यांच्या जन्म हा १० जून १९७२ साली तमिळनाडू येथे झाला आहे. तर google कडून दाखवण्यात येणारे १२ जुलैचे सर्च हे सुंदर पिचाई यांच्या बायोग्राफी Britannica येथून येत आहे. तिथल्या सर्च नुसार सुंदर पिचाई यांचा वाढदिवस १२ जुलै दाखवत आहे. २ ऑक्टोबर २०१६ रोजी Britannica वर त्याचा वाढदिवस पब्लिश करण्यात आला त्यानंतर त्यात कोणतेही बदल करण्यात आले नाही. त्यामुळे सुंदर पिचाई यांच्या वाढदिवसाच्या दोन तारखा समोर येत आहेत.

- Advertisement -


सुंदर पिचाई सध्या Alphabet या गुगलच्या पॅरेंट कंपनीचे हेड आहेत. त्यांचे संपूर्ण बालपण हे चेन्नईमध्येच गेले आहे. त्यांनी Indian Institute of Technology मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुंदर पिचाई हे २००४मध्ये गुगलशी जोडले गेले आणि त्यांचा प्रवास सुरु झाला. Google Toolbar आणि Google Chromeची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NTPC Recruitment: इंजिनिअरींग एग्झीक्यूटिव्ह ट्रेनीच्या २८० पदांवर भरती; आजच करा अर्ज

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -