Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम ठाण्यातील धक्कादायक घटना! मोबाईल चोराला विरोध करताना तरुणीचा धावत्या रिक्षातून पडून मृत्यू

ठाण्यातील धक्कादायक घटना! मोबाईल चोराला विरोध करताना तरुणीचा धावत्या रिक्षातून पडून मृत्यू

ही धक्कादायक घटना ठाण्यातील तीन हातनाका येथे घडली.

Related Story

- Advertisement -

मोबाईल चोराला विरोध करताना डोंबिवलीत राहणाऱ्या नोकरदार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. कामावरून घरी रिक्षातून जात असताना मोबाईल चोराला विरोध करताना एका तरुणीचा धावत्या रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील तीन हातनाका येथे घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी दोन मोबाईल चोरांना अटक केली आहे. कन्मीला आरांगसू रायसींग (२७) असे या तरुणीचे नाव असून ती मिझोराम राज्यातील नागरिक आहे. मुंबईतील सांताक्रूझ पूर्व सीएसटी रोडवरील कलिना व्हिलेज रोड येथे कन्मीला आरांगसू रायसींग ही मैत्रिणीसह भाडेतत्त्वावर राहण्यास होती.

डोक्याला गंभीर जखम होऊन उपचारापूर्वीच मृत्यू  

ठाण्यातील विवियाना मॉल येथील एका स्पामध्ये नोकरी करणारी ही तरुणी बुधवारी रात्री रिक्षाने घरी जात असताना मोबाईल चोरांनी तिच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करून पळ काढला. अचानक झालेल्या या घटनेमुळे या तरुणीचा धावत्या रिक्षातून तोल गेला आणि ती रिक्षाच्या बाहेर पडली. डोक्याला गंभीर जखम होऊन उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोन मोबाईल चोरांना गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे.

- Advertisement -