घरदेश-विदेशआंतरजातीय विवाहासाठी मिळणार 2.50 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या योजना आणि फायदे

आंतरजातीय विवाहासाठी मिळणार 2.50 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या योजना आणि फायदे

Subscribe

आज आम्ही तुम्हाला सरकारच्या या खास योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही आंतरजातीय विवाह करण्याचा विचार करत असाल तर ही मदत मिळवू शकता. नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊया...

आजही आपल्या देशात आंतरजातीय विवाह पद्धतीकडे अनेक लोक एका संकुचित विचारसरणीतून पाहतात. मात्र या विवाह पद्धतीकडे एका चुकीच्या नजरेने न पाहता त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे.तसेच या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आज भारतातील अनेक भागात आंतरजातीय विवाहामुळे तरुण-तरुणींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यातून ऑनर किंलसारख्या अनेक घटना समोर आल्यात. मात्र सरकारकडून आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी आणि समाजात पसरलेली ही संकुचित विचारसरणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जातेय. त्यामुळे लग्नाचं वय असणाऱ्या तरुण तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जातेय. होय, हे अगदी खरे आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या या खास योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही आंतरजातीय विवाह करण्याचा विचार करत असाल तर ही मदत मिळवू शकता. नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊया…

अशा प्रकारे मिळवा योजनेचा लाभ

ही योजना डॉ. आंबेडकर फाऊंडेशन नावाने ओळखली जाते, ज्या अंतर्गत तुम्हाला 2 लाख 50 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात:-

- Advertisement -

1. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. त्यापैकी एक दलित समाजातील असावा आणि दुसरा दलित समाजाबाहेरील असावा.

2. तसेच त्यांचा विवाह हिंदू विवाह कायदा 1995 अंतर्गत नोंदणीकृत असावा. ज्यासाठी तुम्हाला अधिकृत प्रतिज्ञापत्र सादर करावा लागेल.

- Advertisement -

3. या योजनेचा लाभ अशा नवविवाहित जोडप्यांना मिळेल आहे जे पहिल्यांदाच लग्न करत आहेत. दुसरं किंवा जास्त वेळा लग्न करणाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही.

4. लग्नानंतर तुम्हाला डॉ. आंबेडकर फाउंडेशनसाठी अर्ज करावा लागेल. मात्र लग्नानंतर एक वर्षाच्या आत अर्ज केल्यासचं तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.


‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ ठरली खास अवॉर्डची मानकरी, इंटरनेटवर फोटो व्हायरल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -