घरट्रेंडिंग'रमजान'साठी मतदानाच्या तारखा बदला; मुस्लिमांची मागणी

‘रमजान’साठी मतदानाच्या तारखा बदला; मुस्लिमांची मागणी

Subscribe

'या निवडणुका रमजानच्या महिन्यात ठेवण्यात आल्यामुळे याचा मुस्लिमांना सर्वाधिक त्रास होईल', असं वक्तव्य कोलकत्ताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम यांनी केलं आहे.

रविवारी निवडणुक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. मात्र, आता या तारखांवरुन एक नवीन वाद उदयास आला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील मतदानाच्या तारखा या रमजानच्या महिन्यात येत आहेत. त्यामुळे मुस्लिम नेते आणि मौलवींनी निवडणूक आयोगाच्या हेतूवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, रमजानच्या महिन्यांत येणाऱ्या मतदानाच्या या तारखा बदलण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याविषयी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना कोलकत्ताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम म्हणाले, ‘निवडणूक आयोगाचा आम्ही सन्मान करतो. निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था असून, त्याविरोधात आम्ही बोलू इच्छित नाही. मात्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांसाठी हा काळ कठीण असेल.’ ‘या निवडणुका रमजानच्या महिन्यात ठेवण्यात आल्यामुळे याचा मुस्लिमांना सर्वाधिक त्रास होईल’, असंही हकिम यावेळी म्हणाले.

- Advertisement -

यावेळी बोलताना हकीम म्हणाले की, ‘वरील तिनही राज्यात अल्पसंख्यांक लोक अधिक प्रमाणात आहेत. दरम्यान, मुस्लिम लोक रोजेही ठेवणार आणि मतदानही करणार याची निवडणूक आयोगाने दखल घ्यायला हवी. अल्पसंख्यांकांनी मतदान करुन नये अशी भाजपतची इच्छा असल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत’. ‘भाजपा हटाओ-देश बचाओ यासाठी लोक प्रतिबद्ध आहेत’, असंही ते यावेळी म्हणाले.

… म्हणून मुस्लिमांची अडचण

दुसरीकडे इस्लामिक विद्वान आणि लखनऊ ईदगाहचे इमाम मौलाना खालीद रशीद फिरंगी महली, यांनीदेखील निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप नोंदवला आहे. मतदानाच्या तारखा बदलून त्या रमजानपूर्वी किंवा ईदनंतर ठेवल्या जाव्यात, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी ६, १२ आणि १९ मे या तारखा जाहीर केल्या असून, ५ मेच्या रात्री रमजान मुबारकचा चंद्र दिसू शकतो. कारण ६ मेपासूनच रमजानच्या महिन्याला सुरुवात होते आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -