घरदेश-विदेशपानसरे हत्या प्रकरण, अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

पानसरे हत्या प्रकरण, अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

Subscribe

पुण्याला राहणारा अमोल काळे पत्रकार गौरी लंकेस हत्येप्रकरणी अटकेत होता. बँगलोर एटीएसने अमोल काळेला अटक केली होती. या तपासादरम्यात पानसरे हत्याप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले.

अॅड. गोविंद पानसरे हत्येतील पाचवा संशयित आरोपी अमोल काळे याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पानसरे हत्या प्रकरणात प्रथमदर्शी सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या हत्या प्रकरणातील अमोल हा पाचवा संशयित आरोपी असून पुण्यात राहणाऱ्या अमोलला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वाचा- पानसरे हत्याकांडाची उकल होणार?

एटीएसने घेतले ताब्यात

कोल्हापूरच्या एटीएसने ही कारवाई केली असून आज सकाळी सुमारे ४५ मिनिटे युक्तिवाद झाला. १४ नोव्हेंबरला अमोल काळेला बँगलोर न्यायालयाच्या आदेशानंतर अटक करण्यात आली होती. तेथील राजराजेश्वरी पोलीस ठाण्यातून त्याला एटीएसने ताब्यात घेतले.

- Advertisement -

कोण आहे अमोल काळे ?

पुण्याला राहणारा अमोल काळे पत्रकार गौरी लंकेस हत्येप्रकरणी अटकेत होता. बँगलोर एटीएसने अमोल काळेला अटक केली होती. या तपासादरम्यात पानसरे हत्याप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला कोल्हापूर एटीएसने बुधवारी अमोलचा बँगलोर येथून ताबा घेतला.

वाचा- नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत आणखी दोघांचा सहभाग – सीबीआय

का दिली १४ दिवसांची कोठडी?

अमोल काळे नोव्हेंबर/ डिसेंबर २०१४ या कालावधीत कोल्हापूरात वास्तव्याला होता. या वास्तव्यादरम्यान त्याने खूनाचा कट कसा रचला, त्याचे साथीदार कोण आहेत, त्याने शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कोठून घेतले असा अधिक तपास पोलिसांनी करायचा आहे, यासाठी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -