घरमहाराष्ट्रनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत आणखी दोघांचा सहभाग - सीबीआय

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत आणखी दोघांचा सहभाग – सीबीआय

Subscribe

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे लोटल्यानंतर या हत्येप्रकरणी आणखी दोन आरोपींचा यात समावेश असल्याचे सीबीआयच्या तपासात पुढे आले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आखणी दोघांचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. ज्या ओंकारेश्वर पुलावर दाभोलकरांची गोळी झाडून हत्या करण्यात आली त्या पुलावर दाभोलकरांना ओळखणारे दोघे त्या ठिकाणी आधीच पोहोचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे त्या पुलावर पोहोचले. हे दोघे पुलावर पोहोचल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या घालून हत्या झाल्याचे सीबीआयच्या तपासातून पुढे आले आहे.

नेमके काय घडले?

डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘मॉर्निंग वॉक’साठी २० ऑगस्ट २०१३ रोजी ओंकारेश्वर पुलावर गेले होते. दाभोलकर पोहोचण्याआधीच त्यांना ओळखणारे दोन इसम त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यानंतर त्या ठिकाणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी त्या ठिकाणी पोहोचलेल्या दोन व्यक्तींना ‘हेच दाभोलकर आहेत का’? असा प्रश्न केला. दाभोलकर हेच असल्याची खात्री करुन घेतल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. कळसकर आणि अंदुरे या दोघांना दाभोलकरांची ओळख पटवून देणारे ते दोघे ही या हत्येत सहभागी असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्याचबरोबर वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी हत्येसाठी वापरलेल्या चार पिस्तुलांची विल्हेवाट देखील लावली असल्याची माहिती सीबीआयच्या तपासात पुढे आली आहे.

- Advertisement -

५ वर्षाचा कालावधी उलटला

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. आता पाच वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नालासोपारा स्फोटप्रकरणी तपास करीत असताना एटीएसला दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे मिळाले आहेत.

आतापर्यंत ८ आरोपींना अटक

नालासोपारा येथील सोपारा गावात राहणाऱ्या वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर मुंबई एटीएसने मध्यरात्री छापा टाकून ८ देशी बॉम्ब जप्त केले होते. त्यानंतर एटीएसने वैभव राऊतसह पाच जणांना बेकायदा शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी विविध कलमांनुसार अटक केली. वैभव राऊतला सर्वात आधी पोलिसांनी अटक केली. या तपासा दरम्यान पोलिसांनी सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरला आणि शरद कळसकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर धुळ्यातून दोन जणांना अटक करण्यात आली होती. तर जालन्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले होते. महाराष्ट्रातील काही ठिकाणी स्फोट घडवण्याचे षडयंत्र यांनी रचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

- Advertisement -

 

वाचा – नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; आणखी एक जण एटीएसच्या ताब्यात

वाचा – दाभोलकर -पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने फटकारले

वाचा – श्याम मानव, मुक्ता दाभोलकर आणि जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर

वाचा – दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -