Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश SpiceJet भारतासाठी जगभरातून एअरलिफ्ट करणार १० हजार Oxygen Concentrators

SpiceJet भारतासाठी जगभरातून एअरलिफ्ट करणार १० हजार Oxygen Concentrators

Related Story

- Advertisement -

देशातील वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकार अमेरिकेतून १० हजार ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स आयात करणार आहे. येत्या आठवड्यापासून हे ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स आयात करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेबरोबर एअर बबल कराराअंतर्गत सॅन फ्रान्सिस्को ते दिल्लीसाठी पुढील उड्डाणं येत्या आठवड्यात मोठ्या संख्येने ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स आयात करण्यात येणार आहे. तसेच, स्पाइस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, येत्या काही दिवसांत स्पाइस जेट कंपनी जगभरातून १० हजाराहून अधिक ऑक्सिजन कंसेंट्रेटर भारतासाठी एअरलिफ्ट करणार आहे.

यासह कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असताना देशभरात कोरोनाच्या लाटेने कहर केला आहे. यादरम्यान, कोरोना बाधितांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. मात्र देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रूग्णांना या ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागत आहे. परंतु, स्पाइस एक्सप्रेसने ८०० ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स हाँगकाँगहून दिल्लीला विमानात पाठवण्यात आले आहे. स्पाइसजेटच्या मालवाहून नेणाऱ्या स्पाइसएक्सप्रेसने एका निवेदनात असे म्हटले, ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स कोलकत्ता मार्गे दिल्लीला पोहचतील आणि ते सोमवारी संध्याकाळपर्यंत तेथे उतरवण्यात येतील.

- Advertisement -

तसेच, शिकागो येथूनही ऑक्सिजन कंसेंट्रेटर आणले जाणार आहे. ऑक्सिजन कंसेंट्रेटर निर्माता कंपनी फिलिप्सचे भारतीय उपखंडातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मॅझन यांनी सांगितले की, ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता, कंपनीने ऑक्सिजन कंसेंट्रेटरच्या जागतिक उत्पादनामध्ये वाढ केली आहे आणि कंपनी लवकरात लवकर भारताला उपलब्ध करून देणार आहे. तर आयटीसी लिमिटेड या बड्या एफएमसीजी कंपनीने शनिवारी सांगितले की, त्यांनी आशियाई देशांमधून वैद्यकीय ऑक्सिजन वाहतुकीसाठी क्रायोजेनिक आयएसओ कंटेनर खरेदी करण्यासाठी जर्मन कंपनी लिंडे इंडिया लिमिटेडबरोबर करारही करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातून भारतासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन कंसेंट्रेटर लवकरात लवकर उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

 

- Advertisement -