घरदेश-विदेशगुजरातमध्ये नवरात्रानिमित्त महाआरती सोहळा

गुजरातमध्ये नवरात्रानिमित्त महाआरती सोहळा

Subscribe

दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर गुजरातमधील सूरतच्या उमिया मंदिरात महा आरतीचा सोहळा पार पडला. यावेळी दिव्यांच्या रोषणाईत मंदिर परिसर उजळन गेला.

देशभरात नवरात्रौत्सवाची धामधुम सुरु असताना गुजराजमधील सूरत येथील उमिया मंदिरात काल, बुधवारी रात्री महा आरतीचा दैदिप्यमान सोहळा पार पडला. हजारो दिव्यांच्या रोषणाईने रात्रीच्या काळोखातही मंदिराचा परिसर उजळून गेला. यावेली देवीची आरती, पालखी, प्रार्थनेचा निदान येथे होऊ लागला. लाखो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. हातात पणत्या घेऊन देवीची आराधना करतानाचे भक्त एएनायने काढलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. हा सोहळा प्रत्येकाचेच डोळे दिपवणारा असा आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये पारंपारिक नवरात्र उत्सव

नवरात्रौत्सवाला गुजरातमध्ये विशेष महत्त्व आहे. या सणात नऊ दिवस देवीची स्थापना करून तिची पूजा केली जाते. गुजराती बांधव आणि भगिनी उपवास करतात. आपल्या पायात वहाणही न घातला नऊ दिवस अनवाणी फिरतात. तर रात्री पारंपारिक पोषाखात दांडिया आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटतात.

gujarat temple
सूरतमधील मंदिरात दिव्यांचा सोहळा (सौजन्य-एएनआय)

 

gujarat temple
सूरतमधील मंदिरात दिव्यांचा सोहळा (सौजन्य-एएनआय)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -