घरदेश-विदेशराहुल गांधींनंतर गुजरातमध्ये आणखी एका काँग्रेस नेत्याला मोदींच्या अपमान प्रकरणी शिक्षा, 'असे'...

राहुल गांधींनंतर गुजरातमध्ये आणखी एका काँग्रेस नेत्याला मोदींच्या अपमान प्रकरणी शिक्षा, ‘असे’ आहे प्रकरण

Subscribe

पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्या प्रकरणी गुजरातमधील आमदाराला ९९ रुपये दंड

गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर गुजरातमध्ये आणखी एका न्यायालयात काँग्रेसच्या आमदाराला पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्या प्रकरणी दंड करण्यात आला आहे.
गुजरातमधील नवसारी येथील न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल (Congress MLA Anant Patel) यांना शिक्षा सुनावली आहे. अनंत पटेल आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 2017 मध्ये केलेल्या आंदोलन प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
अनंत पटेल आणि इतरांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन आणि कुलगुरूंच्या टेबलावर ठेवलेला पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याचा आरोप आहे. न्यायालयानं या प्रकरणातील पटेल यांच्यासह तीन आरोपींना गुन्हेगारी स्वरुपात दोषी ठरवलं आणि त्यांना 99 रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सात दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादींनी आमदार अनंत पटेल यांना आयपीसी कलम 447 अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. या कलमानुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 500 ​​रुपये दंडाची तरतूद आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 मध्ये लोकसभा प्रचारादरम्यान कर्नाटकातील एका जाहीर सभेत नीरव मोदी, ललित मोदी, मेहूल चौक्सी यांना चोर म्हटले होते. सर्व चोरांची नावे मोदीच कशी असतात.. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी. अजून शोध घेतला तर आणखी सापडतील. असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात सूरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी 23 मार्च रोजी कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने तातडीने कारवाई करत राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

काय घडले होते आंदोलनात
गुजरातमध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान, आमदार अनंत पटेल आणि आंदोलक विद्यार्थी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या ऑफिसमध्ये घुसले. यावेळी संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोदी ( PM Narendra Modi) फोटो फाडला. या प्रकरणी न्यायालयाने आमदार पटेल यांना दोषी ठरवत 99 रुपये दंड ठोठावला आहे.

- Advertisement -

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. ए. धदल यांच्या न्यायालयानं वंसदा या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघाचे आमदार अनंत पटेल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 447 अंतर्गत दोषी ठरवले आहे. अनंत पटेल आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांसह आणखी सहा जणांवर आयपीसी कलम 143 , 353, 427, 447 आणि 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अहवाल मे 2017 मध्ये जलालपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -