घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरात की दिल्ली? आप कुठे लक्ष देणार? अरविंद केजरीवाल संभ्रमात

गुजरात की दिल्ली? आप कुठे लक्ष देणार? अरविंद केजरीवाल संभ्रमात

Subscribe

दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल असल्याचं बोललं जातं. त्यामुळे केजरीवाल यांना महापालिका निवडणुकीतही लक्ष घालावं लागणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्रित लागल्याने अरविंद केजरीवाल यांची दमछाक होणार आहे.

नवी दिल्ली – दिल्लीत महापालिकांच्या निवडणुका (MCD Election 2022) जाहीर झाल्या आहेत. 4 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 7 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्लीचे राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी दिलीय. दरम्यान, कालच गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Election 2022) बिगुल वाजले आहे. दिल्लीच्या महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी ‘आप’ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तर गुजरातमध्येही ‘आप’ने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. दिल्लीत लक्ष द्यावं तर गुजरात हातातून जाणार आणि गुजरातमध्ये लक्ष दिल्यास दिल्ली महापालिकेवर पाणी सोडावे लागणार आहे.

हेही वाचा – दिल्लीत महापालिका निवडणुका जाहीर, 4 डिसेंबरला मतदान, 7 डिसेंबरला निकाल

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पंजाबमध्ये यश मिळाल्यानंतर ‘आप’ने आपला मोर्चा गुजरातमध्ये वळवला. ‘आप’ने गुजराती नागरिकांसाठी विविध आश्वासानं दिली आहेत. त्यामुळे यावेळेस गुजरातमध्ये तिहेरी निवडणूक पाहायला मिळणार आहे. भाजपा, काँग्रेस आणि आप यांच्यात कडवी लढत होणार आहे. त्यामुळे ‘आप’ला गुजरातमध्ये जरा जास्तच लक्ष घालावं लागणार आहे. मात्र, तेवढ्यातच दिल्ली महापालिकांच्याही निवडणुका लागल्या आहेत.

दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल असल्याचं बोललं जातं. त्यामुळे केजरीवाल यांना महापालिका निवडणुकीतही लक्ष घालावं लागणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्रित लागल्याने अरविंद केजरीवाल यांची दमछाक होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Gujarat Election: २०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?

अरविंद केजरीवालांनी फक्त गुजरातमध्ये लक्ष ठेवल्यास दिल्लीची महापालिका हातातून जाऊ शकते. याचा फटका त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीतही बसेल. जर, त्यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत लक्ष केंद्रीत केलं तर गुजरातमध्ये भाजपा बहुमताने जिंकून येऊ शकतो. पंजाबमध्ये ‘आप’ला चांगलं यश मिळालं होतं. गोव्यातही ‘आप’ने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे गुजरातमध्ये ‘आप’ने चांगलं लक्ष दिलं तर गुजरातही त्यांच्या हातात येऊ शकतं. त्यामुळे अरविंद केजरीवाल कुठे जास्त लक्ष देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आले तर, मोफत वीज आणि कर्जमाफी देण्याचे राहुल गांधींचे आश्वासन

दिल्लीत निवडणुका जाहीर

दिल्लीत 7 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याचे दिल्ली निवडणूक आयोगाने सांगितले. 14 नोव्हेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख असेल. 16 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर असेल. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा असल्या तरी 2 जागांवरील वॉर्डांमध्ये निवडणूक होणार नाही. अशा स्थितीत विधानसभेच्या 68 जागांमधील वॉर्डांमध्ये निवडणूक होणार असून, त्यात 250 प्रभाग आहेत. मागील वेळेप्रमाणेच ईव्हीएमचा वापर केला जाईल. निवडणुकीत एक लाखाहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये पोलिसांचाही सहभाग असेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -