Gujarat Rape Case: घराबाहेर खेळणाऱ्या मुलीचे अपहरण करून पंजाबमध्ये केला बलात्कार, आरोपीला २० वर्षांचा कारवास

Gujarat Rape Case Man gets 20 years in jail for kidnapping, raping minor girl
Gujarat Rape Case: घराबाहेर खेळणाऱ्या मुलीचे अपहरण करून पंजाबमध्ये केला बलात्कार, आरोपीला २० वर्षांचा कारवास

गुजरातच्या सुरतमध्ये पॉक्सो प्रकरणातील एका विशेष न्यायालयाने २०१७मध्ये एका मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आलेल्या प्रकरणावर काल, मंगळवारी सुनावणी पार पडली. याप्रकरणातील आरोपीला २० वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Man gets 20 years in jail for kidnapping, raping minor girl)

लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायालयाने न्यायाधीश दिलीप महिदा यांनी इंद्रजीत अरक (वय ३०) याला दोषी ठरवले आहे. तसेच या आरोपीला २० वर्षांचा कारवास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष तुरुंगवासात राहावे लागेल असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारच्या योजनेंतर्गत पीडितेला १.५ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

स्थलांतरित कामगाराची पीडित मुलगी एप्रिल २०१७मध्ये सचिन जीआयडीसी ठाणे परिसरात आपल्या घराबाहेर मित्र-मैत्रीणीसोबत खेळत होती. त्याचवेळेस तिचे अपहरण करण्यात आले. तिच्या कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. तपासा दरम्यान समजले की, आरोपी इंद्रजीत अरक मुलीला उत्तर प्रदेश आणि पंजाबला घेऊन गेला आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला भारतीय दंड संहिताच्या विविध कलम आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक केली होती.


हेही वाचा – Aryan Khan Bail Hearing Update: आर्यनकडे ड्रग्ज मिळाले नाही, पण कटात सहभागी; NCB चा युक्तिवाद