घरदेश-विदेशलक्षणं नसलेले रुग्ण कोरोना संसर्ग पसरवू शकत नाही - आरोग्य मंत्रालय

लक्षणं नसलेले रुग्ण कोरोना संसर्ग पसरवू शकत नाही – आरोग्य मंत्रालय

Subscribe

ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत किंवा ज्यांना ताप नाही ते रूग्ण संसर्ग पसरू शकत नाही

कोरोना व्हायरसबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत किंवा ज्यांना ताप नाही ते रूग्ण संसर्ग पसरू शकत नाही. अशा रुग्णांना सलग ३ दिवस ताप नसल्यास त्यांना १० दिवसानंतर डिस्चार्ज देता येईल. तसेच त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्याचीही आवश्यकता नाही. मात्र अशा रूग्णांना डिस्चार्जनंतर ७ दिवस घरी आयसोलेट व्हावे लागेल. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात ६९% कोरोना रुग्ण बिनालक्षणं असणारे आढळलेले आहेत.

देशातील कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ७८९ नवीन रुग्ण आढळले. एका दिवसात तीन हजारांहून अधिक रूग्ण बरे झाले तर १३२ लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. भारतात आता या जीवघेण्या व्हायरसचे १ लाख १२ हजार ३५९ रुग्ण आहेत. तसेत, ४५ हजार ३०० लोक या आजारावर मात करून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३ हजार ४३५ लोकांनी आपला जीव गमावला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग झालेल्या अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या कमी होताना दिसत नाहीये. तर गेल्या २४ तासांत देशात १३२ जणांचा मृत्यू झाला असून ५ हजार ६०९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १२ हजार ३५९ वर पोहोचला आहे. यापैकी ६३ हजार ६२४ कोरोना रुग्ण असून ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


CoronaVirus: न्यूयॉर्कसारखी मुंबई बनणार कोरोनाची राजधानी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -