घरCORONA UPDATECoronaEffect: पुण्यात यंदा साधेपणाने होणार सार्वजानिक गणेशोत्सव

CoronaEffect: पुण्यात यंदा साधेपणाने होणार सार्वजानिक गणेशोत्सव

Subscribe

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संकटाचा परिणाम धार्मिक सण-उत्सवांवरही होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडणे, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणे, यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मंडळांच्या बैठकीत याबाबत एकमत झाल्यानंतर हा निर्णय समोर आला आहे. दरम्यान बाप्पाच्य मिरवणुकीबाबात अद्याप काहीही सुचना दिलेल्या नाहीत. त्या वेळेच्या परिस्थितीनुसार यावर निर्णय होईल, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल सर्व मंडळांचे पुणेकरांच्यावतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले.

हेही वाचा – कर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

ऐतिहासिक गणेशोत्सवाला भाविक मुकणार

गणेशोत्सावाला पुण्यात दरवर्षी वेगळीच धुम पाहायला मिळते. मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ हलवाई या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पुण्यात गर्दी करतात. या उत्सवातील मंडपाची शोभा आणि सजावटी डोळे दिपवून टाकणारी असते. तसेच या सर्व गणपती बाप्पाचे विसर्जन आणि त्याला लागणारा कालावधी हादेखील चर्चेचा विषय असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गणपती उत्सवदेखील साधेपणाने साजरा होणार असून भाविक दरवर्षीच्या धुमधडाक्याला मुकणार आहेत.

सर्व अटी पाळून सण साजरा होणार 

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून, गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. असेही या बैठकीअंती सांगण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवाच्या स्वरुपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -