घरदेश-विदेशअयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी

Subscribe

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज  ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर ही सुनावणी होईल.

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज  ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर ही सुनावणी होईल. ५ सदस्यीय घटनापीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि अन्य न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एन. वी. रमन्ना, न्यायमूर्ती यु. यु.लळीत आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड देखील असणार आहेत. ६ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने अर्ध्या मिनिटांमध्ये सुनावणी घेतली होती. यावेळी न्यायालयाने याप्रकरणी खंडपीठ तयार करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर अयोध्याप्रश्नी आज सुनावणी होणार आहे. अयोध्याप्रश्नावरील खटल्यासाठी निश्चित करण्यात आलेले ५ सदस्यीय घटनापीठ आता इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने २७ डिसेंबर २०१८ रोजी बहुमताने हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्यास नकार दिला होता. तर, मस्जिद इस्लामचा अभिन्न भाग नसल्याचे देखील म्हटले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा – शिवसेनेचा अयोध्या ‘हुंकार’ संपला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -