घरदेश-विदेशकाँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, विकासातील अडथळा; पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, विकासातील अडथळा; पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका

Subscribe

देशात आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांनी या निवडणूका जिंकण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. हिमाचलमध्ये भाजपचे अनेक बडे नेते सभा घेत आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कांगडामधील चंबी मैदानातून हिमाचल प्रदेशच्या जनतेला संबोधित केले. यावेळी मोदींनी भाजपच्या डबल इंजिन सरकारचे कौतुक करत काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. (himachal pradesh assembly election pm narendra modi target on congress corruption nepotism obstruction of development works)

यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेस हिमाचलप्रदेशमध्ये स्थिर सरकार देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही, त्यांची फक्त दोन ते तीन राज्यातचं सत्ता उरली. काँग्रेसशासित राज्यातून कधी विकासाच्या बातम्या येतात का? फक्त भांडणाच्या बातम्या येतात. काँग्रेस म्हणजे भ्रष्ट्राचार, विकासातील अडथळा आहे. घराणेशाही हाच काँग्रेसचा आधार आहे. असे सरकार कधीच विकास करु शकणार नाही, अशी जहरी टीक पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसवर केली आहे.

- Advertisement -

काँग्रेस म्हणजे अस्थिरतेची हमी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्याची हमी आणि काँग्रेस म्हणजे विकास कामांमधील अडथळे आणण्याची हमी, असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. मोदी पुढे म्हणाले की, उत्तराखंडच्या जनतेने जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला, उत्तर प्रदेशातही 40 वर्षांनंतर एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. अशी राजकीय परंपरा निर्माण करायची आहे की, मतदार आम्हाला पुन्हा संधी देतील. म्हणूनच आम्ही विकासासाठी आणि देशासाठी काम करत आहोत.

- Advertisement -

केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरु केली, हिमाचलच्या भाजप सरकारने गृहिणी योजना चावलून त्यात आणखी लोकांना जोडले. केंद्र सरकारने आयुष्मान योजना सुरु केली, मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. अशी राजकीय परंपरा निर्माण करायची आहे की, मतदार आम्हाला पुन्हा पुन्हा संधी देती, म्हणूनच आम्ही विकासासाठी आणि देशासाठी काम करत आहोत.असही मोदी म्हणाले.


राऊतांच्या जामीनाबद्दल राष्ट्रवादीला आनंद, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘हे लढवय्ये नेते’


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -