घरदेश-विदेशहिंडेनबर्ग अहवालाचा फटका : टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर

हिंडेनबर्ग अहवालाचा फटका : टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर

Subscribe

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा मोठा फटका प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना बसला आहे. काही दिवसांपूर्वीच ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावरून 11व्या क्रमांकावर आले होते. पण आता ते टॉप 20च्या यादीत देखील नाहीत.

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. यावरून देशात विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले असून सध्या ते 22व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांचे एका दिवसात सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 12.5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या स्थानावर पोहोचले आहेत.

सप्टेंबरमध्ये अदानी यांची एकूण संपत्ती 155.7 अब्ज डॉलर होती. तर, सोमवारी ही संपत्ती 92.7 अब्ज डॉलर होती. डिसेंबरपर्यंत, जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये अदानी असे एकमेव श्रीमंत होते की, ज्यांच्या संपत्तीत त्यावर्षी वाढ झाली होती. अदानी यांचे नाव आता जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 22व्या क्रमांकावर घसरले आहे.

- Advertisement -

हिंडेनबर्गच्या अहवालात काय आहे?
हिंडेनबर्ग रिसर्चने 25 जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत 32 हजार शब्दांचा अहवाल जारी केला होता. या अहवालाच्या निष्कर्षांमध्ये 88 प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे. शेअर्सच्या वाढत्या किमतीमुळे अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांची संपत्ती तीन वर्षांत 120 अब्ज डॉलर्स झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या कालावधीत समूहातील 7 कंपन्यांचे शेअर्स सरासरी 819 टक्क्यांनी वाढले आहेत.

हेही वाचा – हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -