घरताज्या घडामोडीDelta Variant: डेल्टा व्हेरियंटचे १७ म्युटेशन, केंद्राची माहिती

Delta Variant: डेल्टा व्हेरियंटचे १७ म्युटेशन, केंद्राची माहिती

Subscribe

देशात काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट मंदावत असल्याचे म्हटले जात आहे. पण डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असे सांगितले जात आहे. भारतात डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव सध्या वाटताना दिसत असल्यामुळे चिंता वाढली आहे. देशात डेल्टा व्हेरियंट, ज्याला सार्स सीओव्ही- २ (SARS-CoV-2) बी.१.६१७ (B.1.617) म्हणून देखील ओळखले जाते. त्या डेल्टा व्हेरियंटचे १५ ते १७ म्युटेशन आहेत, अशी माहिती मंगळवारी केंद्राने दिली आहे.

- Advertisement -

देशात ऑक्टोबर २०२०मध्ये पहिल्यांदा डेल्टा व्हेरियंट आढळला होता. ज्याचे १५ ते १७ म्युटेशन आहेत. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरियंटचे तीन उपप्रकार B.1.617.1, B.1.617.2, आणि B.1.617.3 आहेत. यामधला पहिला आणि तिसरा व्हेरियंट हा अभ्यासासाठी दखल घेण्यापुरती (variant of interest) आहे. मात्र दुसरा व्हेरियंट म्हणजेच डेल्टा प्लस हा चिंताजनक व्हेरियंट (variant of concern) आहे. असे या तीन डेल्टा व्हेरियंट उपप्रकारांना वर्गीकृत केले आहे.

माहितीनुसार, डेल्टा व्हेरियंटपेक्षा डेल्टा प्लस हा अधिक तीव्र आणि अत्यंत संसर्गक्षम व्हेरियंट आहे. देशात ५१ डेल्टा प्लस केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशमध्ये सात, पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येकी २ आणि आंध्र प्रदेश, ओडिसा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि राजस्थान प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तामिळनाडूमध्ये एकूण नऊ डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. तर दक्षिणकडील राज्यात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढत असून केरळमध्ये तीन केसेस आढळल्या आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -