घरताज्या घडामोडीदिवाळखोरीमुळे बँक बुडाल्यावरही ग्राहकांना किती पैसे मिळणार? जाणून घ्या...

दिवाळखोरीमुळे बँक बुडाल्यावरही ग्राहकांना किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

Subscribe

बँकेमध्ये काही लोकांना पैसे ठेवण्यासाठी अद्यापही चिंता सतावत असते. कारण बँके बुडाल्यानंतर आपल्याला पैसे परत नाहीच मिळाले तर काय करायचं, असा प्रश्न सर्व सामान्यांच्या मनात घोळत असतो. तसेच एखादी बँक बुडाल्यानंतर ग्राहकांना किती पैसे सुरक्षितपणे मिळू शकतात?, असा सवाल ग्राहकांच्या मनात उपस्थित होतो. परंतु आता दिवाळखोरीनंतरही बँकेतून ग्राहकांना पैसे परत मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. मागील वर्षातील २०२० मध्ये बँकेच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवीदार फर्स्ट असं म्हणत पाच लाखांपर्यंत गॅरंटीड टाईम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स या कार्यक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली होती. पीएम मोदी यांनी २०२० मध्ये घेतलेल्या निर्णयात सांगितलं की, ही गॅरँटी जगभरातील कोणत्याही देशात देण्यात आलेली नाहीये.

- Advertisement -

२०२० मध्ये केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने २०२० मध्ये विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यात बदल केले होते. बँकेत जमा रकमेची हमी पाच लाख रुपयांपर्यंत घेण्यात आली आहे. यापूर्वी खातेदारांना जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत ठेवींची हमी दिली जात होती. आता तुमची बँकांमध्ये जमा केलेली ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ज्या बँकेत तुमचे पैसे जमा आहेत. ती बँक बुडली तर तुम्हाला पाच लाख रुपये परत मिळतील.

- Advertisement -

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास काय होणार?

बँक ठेवींवर ५ लाख रुपयांच्या सुरक्षेची हमी देण्यात येणार आहे. ग्राहकांनी बँकेत ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास त्यांना फक्त पाच लाख रूपयेचं मिळणार आहेत. परंतु बँक डिफॉल्ट झाल्यास किंवा बुडल्यास, ग्राहकांना फक्त ५ लाख रुपये परत मिळतील. तसेच तुमच्या जमा रकमेचा ५ लाख रुपयां पर्यंतचा विमा उतरवला जाणार आहे.

DICGC कडून खातेदारांना मिळणार रक्कम

सरकार अडचणीत असलेल्या बँकेला बुडू देत नाही आणि ती मोठ्या बँकेत विलीन करते. बँक बंद पडल्यास सर्व खातेदारांना पेमेंट करण्यासाठी DICGC जबाबदार आहे. कारण या रकमेची हमी देण्याच्या बदल्यात DICGC बँकांकडून प्रीमियम आकारते.


हेही वाचा: ST workers strikes : एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटचा अल्टीमेटम, निलंबन रद्द करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -