घरदेश-विदेश१८ वर्षावरील तरुणांनो रेशन कार्डसाठी 'असा' ऑनलाईन अर्ज

१८ वर्षावरील तरुणांनो रेशन कार्डसाठी ‘असा’ ऑनलाईन अर्ज

Subscribe

रेशन कार्ड देशातील रहिवासी असल्याचा सर्वात आधीपासून वापरला जाणरा महत्त्वाचा पुरावा आहे. सध्या आधार कार्डची सेवा आल्यापासून रेशन कार्डचा वापर कमी झाला आहे. परंतु आजही रेशन कार्डच्या माध्यामातून सरकार कित्येक नागरिक कमी दरात गहु, तांदुळ आणि सरकारी योजना पुरवते. यामुळे अनेक गरीब कुटुंबांना स्वस्त दरातील धान्याचा लाभ घेता येतो. इतकेच नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स, एलपीजी गॅस कनेक्शन, शालेय किंवा कॉलेज अॅडमिशन, पासपोर्टसाठी महत्त्वाचे ओळख पत्र म्हणून रेशनकार्डला मान्यता आहे.

परंतु रेशन कार्ड प्रत्येकजण तयार करु शकत नाही. ठरावीक उत्पन्न गटासाठी तसेच प्रत्येक राज्याप्रमाणे रेशन कार्डचे नियम वेगळे आहे. भारताचे नागरिकत्व असणारा १८ वर्षावरील प्रत्येक जण रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतो. पण १८ वर्षाखालील मुलांचे नाव पालकांच्या रेशनकार्डमध्ये जोडले जाते. तर १८ वर्षावरील तरुण स्वत:च्या नावे असणाऱ्या घरावर स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करुन शकतो. परंतु रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक माहिती नसल्याने अनेक अडचणी येतात. परंतु या अडचणी दूर करत ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेऊ…

- Advertisement -

रेशनकार्ड काढण्यासाठी १८ वर्षावरील तरुणांना सर्वप्रथम काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे म्हणजे मतदान कार्ड, पत्ता पुरावा, आधार कार्ड, कुटुंब प्रमुखाचे दोन पासपोर्ट साईज फोटो, वीज/ पाण्याचे बिल/ टेलिफोन बिल यांच्यापैकी एक पुरावा, तसेच भारतीय सरकार मान्य कोणताही एक पुरावा ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत.

या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. प्रत्येक राज्य सरकारकडून रेशन कार्ड सेवा दिली जाते. त्य़ामुळे प्रत्येक राज्यात रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत वेगळी आहे. यासाठी तुम्ही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. यानंतर या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आवश्यक ती कागदपत्रे माहिती यात भरणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ऑफलाइनही अर्ज करु शकता. हे ऑफलाईन रेशनकार्डसाठी अर्ज फी ५ ते ४५ रुपयांपर्य़ंत आहे. यासाठी तुम्ही रेशनकार्डचा ऑफलाइन अर्ज घेऊन आवश्यकती माहिती भरत आपल्या क्षेत्रातील रेशन डीलरला किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडे द्या. अर्जातील अडचणी दूर करण्यासाठी तहसील अधिकाऱ्यांशी संपर्क करु शकता.
तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही अर्जदार अर्ज करु शकतात. मात्र रेशन कार्ड फॉर्म सबमिट केल्यानंतर, स्लिप घ्यायला विसरु नका.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -