घरदेश-विदेशनागपूरमध्ये होणारी कोरोना लसीची मानवी ट्रायल लांबणीवर!

नागपूरमध्ये होणारी कोरोना लसीची मानवी ट्रायल लांबणीवर!

Subscribe

भारत बायोटेक लि. आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोरोनावर लस विकसित केली आहे. कोरोना प्रतिबंधित लसीची मानवी चाचणी दिल्लीतील ‘एम्स’सह चार संस्थेत होत आहे. त्याचे प्राथमिक निरीक्षण आल्यावर राज्यातील एकमात्र नागपूरच्या खासगी रुग्णालयातील केंद्रासह इतर एकूण आठ केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यातील चाचणी होईल. दरम्यान, नागपूरमध्ये होणारी चाचणी सुमारे २० दिवस लांबणीवर पडली आहे.

आयसीएमआरने १५ ऑगस्टपर्यंत या लसीची चाचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. परंतु ते शक्य दिसत नाही आहे. नवीन नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात दिल्ली एम्ससह पाटणामधील एक वैद्यकीय संस्था, रोहतक मेडिकल कॉलेज, निझामुद्दीन इन्स्टिटय़ूट (हैदराबाद) या चार सरकारी केंद्रांमध्ये ही चाचणी होणार आहे. यापैकी काही ठिकाणी चाचणी सुरूही झाली आहे. चारही ठिकाणी १८ ते ५५ वयोगटातील सुमारे ५० निरोगी व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे. प्राथमिक निरीक्षणानंतर दुसऱ्या टप्प्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयसह देशातील इतर ८ केंद्रांवर चाचणी सुरू होणार आहे.

- Advertisement -

नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी या चाचणीसाठी तीस व्यक्तींची यादीही आयसीएमआरसह संबंधित यंत्रणेकडे पाठवली होती. मात्र, नागपूरचा समावेश दुसऱ्या टप्प्यात झाल्याने येथे चाचणी सुरू होण्यास सुमारे २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -