घरदेश-विदेशलॉकडाऊनमध्ये वैतागला; खाल्ले शेकडो चिमण्यांना मारून!

लॉकडाऊनमध्ये वैतागला; खाल्ले शेकडो चिमण्यांना मारून!

Subscribe

पक्षीप्रेमी संस्थांनी या तरूणाची वन विभागाकडे केली तक्रार

कोरोना व्हायरसने पाकिस्तानसह संपूर्ण जगात हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाने बाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यामागील कारण वटवाघूळ हा पक्षी असल्याचेही सांगितले जात आहे, असे असले तरी पाकिस्तानमधील लोकं अजूनही पक्ष्यांची शिकार करून ते पक्षी खात आहेत. सोशल मीडियातील ट्विटरवर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात एका व्यक्तीने शेकडो चिमण्यांची शिकार केली असून त्यांचे मांस जो शिजवून खात आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या इंग्रजी न्यूज वेबसाइट PARHLO ने दिलेल्या माहितीनुसार, डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तालुक्यात साजिद नावाच्या व्यक्तीने शेकडो चिमण्यांची शिकार केली. मात्र पाकिस्तानमध्ये पक्षी शिकार करण्यास मनाई असून हा प्रकार गुन्हेगारीमध्ये मोडतो.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, साजिद आणि त्याच्या साथीदारांना शिकार करण्याचे कारण विचारले असता त्यांनी असे सांगितले की, पक्ष्यांची शिकार करणे हा त्यांच्या छंदाचा एक भाग असून पार्टी देखील करायची होती.साजिदने सांगितले की, शिकार हे स्थलांतरित पक्ष्यांचेच केले असून ते पक्षी या देशातील आहेत. पाकिस्तानमधील प्राणी-पक्ष्यांना जपण्याचे काम करणारी संस्था सेव्ह द लाइफ या संस्थेने हे ट्विट केले होते, ” साजिद आणि त्याच्या मित्रांनी केवळ पार्टीच्या नावाखाली शेकडो चिमण्यांचा शिकार केला.”, असे देखील त्या ट्विटमध्ये सांगण्यात आले होते.

दरम्यान, पक्षीप्रेमी संस्थांनी या तरूणाची वन विभागाकडे तक्रार केली असून त्याविरूद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.


सिंहाच्या गोंडस पिल्लाने जन्मताच दिली गर्जना, पहा व्हायरल व्हिडीओ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -