घरताज्या घडामोडीसंतापजनक! दारुच्या नशेत पतीने पत्नीसह तीन मुलांवर फेकले Acid!

संतापजनक! दारुच्या नशेत पतीने पत्नीसह तीन मुलांवर फेकले Acid!

Subscribe

पोलिसांनी आरोपीला Acid बाटलीसह अटक केली.

मद्यधुंदीत पतीने पत्नी आणि तीन मुलांवर Acid फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नवी दिल्लीत घडली आहे. या घटनेच्या वेळेस पत्नी आणि मुलांच्या ओरडण्याने आजूबाजूचे रहिवाशी लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. पत्नीसह तीन मुलांना जगप्रवेश चंद रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण त्यांना तेथून एम्समध्ये रुग्णालयात पाठवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील चौघांमधील दोन मुलांची प्रकृती स्थिर असून पत्नी आणि एका मुलांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान पोलिसांनी Acid बाटलीसह आरोपी शाहिदला अटक केली आहे.

नक्की काय घडेल?

माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव शाहिद (वय ३२) आणि पत्नीचे नाव मुमताज (वय २८) असे नाव आहे. त्यांना आठ, सहा आणि चार वर्षांची मुले आहेत. शाहिद हा फळांचा व्यवसाय करतो आणि त्याला दारुचे व्यसन आहे. शाहिद आणि मुमताजमध्ये नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून भांडण होत होती. शनिवारी सकाळी ९.३० सुमारास शाहिद दारू पिऊ घरी आला. त्यावेळेस त्याच्या हातात Acidची बाटली होती. त्यादरम्यान शाहिद पत्नीशी भांडण करू लागला. यावेळेस त्यांची तीन निर्दोष मुलेही तिथे उभी होती. दरम्यान शाहिद दारुच्या नशेत होता त्यावेळेस त्याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नीसह तीन मुलांवर Acid फेकले. आरोपी शाहिद न्यायालयात हजर केले असता तिथून त्याला शास्त्री पार्क पोलिसांनी तुरुंगात पाठविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वारंवार छेड काढणाऱ्या सावत्र बापाचा खून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -