Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी शेतकऱ्यांना आता नॅनो यूरियाचा पर्याय ! 'या' राज्यांमध्ये प्रयोगाला सुरूवात

शेतकऱ्यांना आता नॅनो यूरियाचा पर्याय ! ‘या’ राज्यांमध्ये प्रयोगाला सुरूवात

Related Story

- Advertisement -

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंधाधुंद पद्धतीने होणाऱ्या यूरियाचा अतिरेकत आता समोर येऊ लागला आहे. यूरियामुळे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. हीच गोष्ट टाळण्यासाठी आता नॅनो यूरियाचा प्रयोग येऊ घातला आहे. जवळपास ५० किलो यूरियाच्या तुलनेत अवघ्या अर्धा लीटर नॅनो यूरिया या तंत्रज्ञानाद्वारे पुरेसा असणार आहे. त्यामुळेज जिथे ५० किलोचे एक पोते यूरिया खर्ची व्हायचे त्याठिकाणी अवघ्या अर्धा लीटर यूरियामध्ये ही गरज भागवणे शक्य होणार आहे. Nano Urea च्या तंत्रज्ञानामुळेच हे शक्य होणार आहे. सरकारी कंपनी असलेल्या IFFCO ने नॅनो यूरियाचे लिक्विड (द्रव) रूपातील यूरिया निर्मितीला सुरूवात केली आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या कंपनीने या द्रव स्वरूपातील पहिली खेप ही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पाठवली.

नॅनो युरिया ही IFFCO मार्फत गुजरात येथील कलोल स्थित बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये पेटंट तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आले आहे. एक नव्या स्वरूपाचा आणि संशोधनातील आविष्कार म्हणून या नॅनो यूरियाकडे पाहिले जात आहे. याआधी इफकोच्या वतीने हे तंत्रज्ञान ३१ मे २०२१ रोजी नवी दिल्लीतील एक कार्यक्रमात जगासमोर मांडण्यात आले होते. याआधीच इफकोच्या वतीने सांगण्यात आले होते की, शेतीमध्ये युरियाचा अंधाधुंद प्रयोग थांबवण्याची गरज आहे. तसेच यूरियाच्या अतिवापरामुळे अनेक गंभीर समस्या समोर येत आहेत. त्यामुळेच एकुण ५० किलो यूरियाची जागा आता अर्धा लीटर नॅनो यूरियाचे लिक्विड घेणार आहे.

- Advertisement -

इफकोच्या दाव्यानुसार हा नॅनो यूरिया पोषक मूल्यांचा समावेश असलेला आहे. तसेच मातीतले, पाण्यातले आणि वायू प्रदुषण कमी करण्यासाठी हा यूरिया सक्षम आहे. इफकोच्या दाव्यानुसार नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकामध्ये आठ पटीने वाढ होण्यासाठी मदत होईल. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चातली कपात करणे शक्य होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या फायद्यातही वाढ होऊ शकते. गुजरातच्या कलोल आणि उत्तर प्रदेशात आंवला आणि फूलपूर येथे यूरियाचा प्रयोग सुरू झाला आहे. प्रयोगातील पहिल्या टप्प्याअंतर्गत १४ कोटी यूरिया लिक्विड बॉटल्सची उत्पादन क्षमता विकसित करण्यात येईल. तसेच दुसऱ्या टप्प्यात २०२३ पर्यंत आणखी १८ कोटी बॉटल्स तयार केल्या जातील. या नियोजनानुसार २०२३ पर्यंत ३२ कोटी बॉटल्सच्या माध्यमातून १.३७ कोटी मेट्रिक टन यूरियाची जागा घेतील असा अंदाज आहे. भारतात विक्री होणाऱ्या एकुण नायट्रोजनवर आधारीत खतांमध्ये ८२ टक्के प्रमाण हे युरियाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यूरियाचा अतिवापर झाल्याचे आढळले आहे. येत्या २०२०-२१ मध्ये युरियाचा वापर हा ३७ दशलक्ष मेट्रिक टन पोहचेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.


 

- Advertisement -