घरदेश-विदेश'आयएमए' कडून आज डॉक्टरांचा देशव्यापी संप

‘आयएमए’ कडून आज डॉक्टरांचा देशव्यापी संप

Subscribe

डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. हल्लेखोरांवर कारवाई केली जावी, अशीही मागणी केली जात आहे.

पश्चिम बंगाल या ठिकाणी डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीचा निषेध करत IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या सोमवारी २४ तासांच्या बंद मध्ये राज्य रेडिओलॉजी अॅण्ड इमेजिंग संघटना तसेच खासगी डॉक्टरांची असणारी संघटना या देशव्यापी संपात आपला सहभाग दर्शवणार आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. हल्लेखोरांवर कारवाई केली जावी, अशीही मागणी केली जात आहे. तरीही अशा घटना थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे संप पुकारण्यात आल्याचे IMA ने स्पष्ट केले आहे.

खासगी वैद्यकीय सेवेवरही परिणाम

या आजच्या डॉक्टरांच्या देशव्यापी संपामुळे राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात रूग्णांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात एमआरआय. सीटीस्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी अशा सर्व सेवा बंद राहणार असून खासगी वैद्यकीय सेवेवर या संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक रूग्णांना तातडीने उपचार मिळणे कठीण होणार आहे.

- Advertisement -

आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा २४ तास बंद  

पश्चिम बंगालमध्ये संप पुकारणाऱ्या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी IMA शी सलग्न असणाऱ्या डॉक्टरांनी गेल्या शुक्रवारपासून काळ्या फिती लावून काम करत आहेत. आज देशव्यापी संपात आपत्कालीन वैद्यकीय सेवा सोडता अन्य सर्व सेवा २४ तासांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय IMAने घेतला असून हा संप सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, असे बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे रेडिओलॉजी अॅण्ड इमेजिंग संघटनेने जाहीर केले.

सरकारने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक

सीटीस्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी यांसारख्या सेवांमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर आजच्य़ा बंदमध्ये सहभागी होणार असल्याने या सेवा बंद राहणार आहे. रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या समस्या, परिस्थिती समजून घेणे गरजेचे असल्याने हिंसाचार योग्य नाही. डॉक्टरांची सुरक्षिततेकरिता सरकारने देखील योग्य भूमिका घेणे अत्यावश्यक आहे, असे राज्य रेडिओलॉजी अॅण्ड इमेजिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओनकर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -