घर क्राइम तोशखाना प्रकरणी हायकोर्टाने सुटकेचे आदेश देऊनही इम्रान खान तुरुंगातच! कारण...

तोशखाना प्रकरणी हायकोर्टाने सुटकेचे आदेश देऊनही इम्रान खान तुरुंगातच! कारण…

Subscribe

इस्लामाबाद : तोशखाना प्रकरणी शिक्षेला स्थगिती देऊन इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (PTI) प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना दिलासा दिला होता. पण बुधवारी, गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान यांच्या न्यायालयीन कोठडीत 13 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे इम्रान खान लवकरच तुरुंगातून बाहेर येण्याच्या शक्यतेला झटका बसला आहे.

- Advertisement -

तोशखाना प्रकरणात इम्रान खान गेल्या 5 ऑगस्टपासून पंजाबच्या अटक कारागृहात बंद आहेत. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती देत ​​त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही इम्रान खानची सुटका होऊ शकली नाही, कारण गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी न्यायालयाने इम्रान खानला तुरुंगात ठेवून बुधवारी सुनावणीदरम्यान हजर करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा – China’s New Map : भारताचा विकास पचनी पडत नाही, भाजपाची राहुल गांधींवर टीका

- Advertisement -

त्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय कागदपत्र लीक प्रकरणाची सुनावणी अटक कारागृहातच घेण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायाधीश अब्दुल हसनत जुलकरनैन यांनी इम्रान खान यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी एका रॅलीमध्ये इम्रान खान यांनी सरकारी गोपनीय कागदपत्रे फडकावली होती. मात्र, चौकशीदरम्यान ती कागदपत्र हरवल्याचे इम्रान खान यांनी तपास यंत्रणांना सांगितले.

काय आहे प्रकरण?
गोपनीय कागदपत्र लीक प्रकरणात इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हेही अटकेत आहेत. इम्रान खान यांच्यावर देशाच्या गुप्ततेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असताना त्यांनी एका रॅलीत खिशातून एक कागद काढला आणि फडकावला. तो कागद सरकारी गोपनीय दस्तऐवज असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – लडाखमधील चीनच्या घुसखोरीविषयी पंतप्रधान खोटे बोलतायत; राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका

आपले सरकार पाडण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय षडयंत्र’ रचले जात असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. मात्र, चौकशीदरम्यान इम्रान खान यांनी रॅलीत फडकावलेला कागद हा सरकारी गुप्त दस्तऐवज असल्याचा इन्कार केला. तो कागद हरवला असून तो कुठे ठेवला होता हे आठवत नाही, असेही इम्रान खान यांनी तपास यंत्रणांना सांगितले.

- Advertisment -