घरदेश-विदेशपहिल्याच अभिभाषणात राष्ट्रपतींकडून मोदींवर स्तुतीसुमने; म्हणाल्या, जगाचा भारताकडे...

पहिल्याच अभिभाषणात राष्ट्रपतींकडून मोदींवर स्तुतीसुमने; म्हणाल्या, जगाचा भारताकडे…

Subscribe

President Draupadi Murmu | आपल्या समस्या सोडवण्यासाठी भारत पूर्वी दुसऱ्या देशांवर निर्भर होता, मात्र आता जगभरातील समस्या भारत देश सोडवत आहे. ज्या सुविधांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, त्या मागण्या या नऊ वर्षांच्या काळात पूर्ण करण्यात आल्या, असंही मुर्मू यांनी स्पष्ट केलं.

President Draupadi Murmu | नवी दिल्ली – राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पाच्या अभिभाषणात (Budget 2023-24) मोदी सरकारवर (Modi Government) स्तुतिसुमने उधळली आहेत. सरकारने आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे भारतीय नागरिकांनी अनेक सकारात्मक परिवर्तन पाहिल्यांदाच पाहिले आहेत. भारताचा आत्मविश्वास आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

आम्हाला असा भारत बनवायचा आहे जो आत्मनिर्भर आहे आणि जो आपल्या मानवीय दायित्वाला पूर्ण करण्यास समर्थ असेल, ज्यात गरिबी नसेल, जिथे मध्यम वर्गातील नागरिकही सुखी-समाधानी असतील. युवा शक्ती, नारी शक्ती समाज आणि राष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम करेल, असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

- Advertisement -

आपल्या समस्या सोडवण्यासाठी भारत पूर्वी दुसऱ्या देशांवर निर्भर होता, मात्र आता जगभरातील समस्या भारत देश सोडवत आहे. ज्या सुविधांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, त्या मागण्या या नऊ वर्षांच्या काळात पूर्ण करण्यात आल्या, असंही मुर्मू यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने लढा सुरू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

- Advertisement -

राष्ट्रपतींनी म्हटलं की, “या काळात सर्जिकल स्ट्राइकपासून आतंकवादाविरोधात कठोर निर्णय घेण्यात आले. एलओसी ते एलएसीतील अनेक कारवायांना कठोर प्रत्युत्तर देण्यात आले. कलम ३७० हटवण्यापासून तीन तलाकपर्यंत अनेक निर्णायक बदल माझ्या सरकारने केले.”

सध्याच्या सरकारने कोणताही भेदभाव केला नाही. अनेक मुलभूत सुविधा देशातील बहुतेक लोकांपर्यंत पोहोचले आहेत किंवा त्यादृष्टीने यशस्वी पावले टाकली जात आहेत.

द्रौपदी मुर्मू यांनी आयुष्यमान भारत योजनेचेही कौतुक केले आहे. देशातील कोट्यवधी गरीब लोकांना आणखी गरीब होण्यापासून वाचवण्यात आले आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ८० हजार कोटी रुपये खर्च वाचवण्यात आले आहेत. तसंच, सात दशकात सव्वातीन कोटी लोकांच्या घरात पाण्याची जोडणी पोहोचली होती. परंतु, गेल्या तीन वर्षांत ११ कोटी लोकांच्या घरात जलवाहिनी पोहोचली आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचे सकारात्मक बदल आपण पाहत आहोतच. देशात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक झाली आहे. महिलांचं आरोग्यही पूर्वीपेक्षा आता जास्त सुधारले आहे, असंही राष्ट्रपती म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -