घरदेश-विदेशपाकचे पंतप्रधान इमरान खान श्रीलंका दौर्‍यावर; भारताने दिली एयर स्पेस वापरण्याची परवानगी

पाकचे पंतप्रधान इमरान खान श्रीलंका दौर्‍यावर; भारताने दिली एयर स्पेस वापरण्याची परवानगी

Subscribe

इमरान खान हे आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत श्रीलंका दौऱ्यावर

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या एयर क्राफ्टला भारत सरकारने मान्यता दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे दोन दिवस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानने भारताला भारतीय एयर स्पेस वापरण्याची परवानगी मागितली होती. तशी परवानगी आता भारताने पाकिस्तानला दिली आहे. पुलावामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान तणाव वाढला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या विनंतीवरून पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किर्गिस्तान दौर्‍यासाठी आपल्या एयर स्पेसचा वापर करण्यास परवानगी दिली होती. परंतु, लोकांच्या दबावामुळे पंतप्रधान मोदींनी आपला मार्ग बदलला होता.

- Advertisement -

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे मंगळवार म्हणजेच आजपासून श्रीलंकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. इमरान खान हे आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या दौऱ्यावर आहेत.

माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इमरान हे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटन या विषयांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे आमंत्रण स्वीकारुन इमरान खान श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इमरान खान हे श्रीलंका संसदेला संबोधित करणार होते. मात्र श्रीलंका विरोधात सुरू असलेल्या मानवी हक्क संघटनेच्या तपासासह यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची होती. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने इमरान खान यांचे संसदेतील संबोधन रद्द केलं आहे.


Petrol-Diesel Price: दोन दिवसांनंतर पुन्हा इंधन दरवाढ; जाणून घ्या आजचे दर…

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -