घरताज्या घडामोडीश्रीलंकेच्या नौदलाची ताकद वाढणार, भारताने सुपूर्द केले डॉर्नियर सागरी गस्त विमान

श्रीलंकेच्या नौदलाची ताकद वाढणार, भारताने सुपूर्द केले डॉर्नियर सागरी गस्त विमान

Subscribe

भारताने आज एका समारंभात श्रीलंकेच्या नौदलाला डॉर्नियर सागरी गस्त विमान सुपूर्द केले आहे. या कार्यक्रमात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेही सहभागी झाले होते. भारतीय नौदलाचे उपाध्यक्ष व्हाईस अॅडमिरल एस.एन घोरमडे आणि कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी श्रीलंकेच्या नौदलासा समुद्राच्या किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे विमान सुपूर्द केले आहे. वास्तविक, अॅडमिरल घोरमडे श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

श्रीलंकेच्या हवाई दलाचे प्रवक्ते कॅप्टन दुशान विजयसिंघे यांनी राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या कार्यक्रमात उपस्थिती असल्याची माहिती दिली होती. कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या कटुनायके येथील श्रीलंकेच्या हवाई दलाच्या भागात हा सोहळा पार पडला.

श्रीलंकेने आपल्या सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून दोन डॉर्नियर सागरी गस्त विमाने घेण्यावर चर्चा केली होती. श्रीलंकन ​​हवाई दलाचे केवळ १५ सदस्य हे विमान उडवू शकतील, ज्यांना भारतात चार महिने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या टीममध्ये वैमानिक, पर्यवेक्षक, अभियांत्रिकी अधिकारी आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.

- Advertisement -

‘युआन वांग 5’ हे चिनी जहाज हंबनटोटा या दक्षिण बंदरात आठवडाभरासाठी डॉर्नियर सागरी गस्त विमान भारताने श्रीलंकेकडे सुपूर्द केला. जहाज ११ ऑगस्ट रोजी बंदरावर पोहोचणार होते, परंतु श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी न मिळाल्याने त्याला उशीर झाला. कोलंबोने शनिवारी जहाजाला १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत बंदरात थांबण्याची परवानगी दिली होती.

भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केलेले डॉर्नियर २२८ मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट श्रीलंकन हवाई दलाच्या कर्मचाऱ्यामार्फत श्रीलंकेला नेले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकन हवाई दलाने एप्रिल २०२२ मध्ये प्रशिक्षणासाठी १५ कर्मचारी भारतात पाठवले होते. या सर्वांनी विमान उड्डाण आणि देखभालीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. भारतीय अभियंत्यांच्या देखरेखीखाली एसएलएएफचे प्रशिक्षित ग्राउंड क्रू या विमानाची देखभाल केली जाणार आहे.


हेही वाचा : काही मंत्र्यांच्या मुलांनी पात्रता नसतानाही राजकारणात जागा बळकावल्या, घराणेशाहीवरून काँग्रेसची मोदींवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -