घरदेश-विदेशअमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी २१ तोफांची सलामी, पुण्यातील ARDE ने रचला इतिहास

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी २१ तोफांची सलामी, पुण्यातील ARDE ने रचला इतिहास

Subscribe

भारतीय बनावटीच्या २१ हजार तोफांनी भारतीय ध्वजाला आज सलामी देण्यात आली. या तोफा पुण्यात बनवलेल्या आहेत. या ताफा ४८ किमीपर्यंत लक्षाचा वेध घेऊ शकतात. अरमान्टंट रिसर्च अॅण्ड डेव्हलोपमेंट इस्टाब्लिशमेंटकडून (Armament Research and Development Establishment) या तोफा बनवण्यात आल्या आहेत. पूर्वी ब्रिटिशकालीन तोफा सलामीसाठी वापरल्या जायच्या.

हेही वाचा – Independence Day 2022: यंदाचा स्वातंत्र्य दिन नेमका ७५ वा की ७६? का होतोय गैरसमज? जाणून घ्या नेमकं उत्तर

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर आज भारतीय ध्वजाला २१ तोफांची सलामी देण्यात आली. यासाठी मेड-इन-इंडिया आर्टिलरी गन यंत्रणेचा वापर करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून दिली. या स्वदेशी तोफांच्या आवाजाने प्रत्येक भारतीयांचे उर भरून आले असून यापासून प्रेरणा मिळाली आहे. आज मी प्रत्येक जवानांचे मनापासून अभिनंद करतोय. मी जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो तेव्हा, जवानांचे साहस आणि कर्तव्य दक्षतेला सलाम करतो, असंही मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यादिनासाठी पंतप्रधान जेव्हा तिरंगा ध्वज फडकवतात तेव्हा लष्काराच्या मिलिट्री बॅन्डद्वारे राष्ट्रगीत वाजवलं जातं. तसेच, आर्टिलरी रेजिमेंटकडून औपचारिकपणे २१ तोफांची सलामी दिली जाते. पश्चिमी देशांच्या नौसेनेपासून या तोफांची सलामीची परंपरा सुरू झाली. आतापर्यंत सलामीसाठी ब्रिटिश तोफांचा वापर केला जायचा. यंदा पहिल्यांदाच स्वदेशी तोफांनी सलामी देण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने पुण्यातील अरमान्टंट रिसर्च अॅण्ड डेव्हलोपमेंट इस्टाब्लिशमेंटकडून या तोफा विकसित केल्या असून १५५ मिमी*५२ कॅलिबर हॉवित्जर गन आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -