Coronavirus Cases: दिलासादायक! देशात ५३८ दिवसांनंतर सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

corona

देशात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. पण सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ४८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात ५३८ दिवसांनंतर सर्वाधिक कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४३ इतकी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १२ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत देशातील ४ लाख ६५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ३४ हजार ५४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार लसीकरण सुरू आहे. देशात दिवसाला लाखो लोकांचे लसीकरण होत आहे. कोविन डॅशबोर्डनुसार, आतापर्यंत देशात ११७ कोटी २ लाख १८ हजार ४८७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ७६ कोटी ७७ लाख ७७ हजार ७५४ जणांनी पहिला लसीचा डोस घेतला असून ४० कोटी २४ लाख ४० हजार ७३३ जणांनी दुसरा लसीचा डोस घेतला आहे.

आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात २१ नोव्हेंबरपर्यंत ६३ कोटी २५ लाख २४ हजार २५९ जणांच्या नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ७ लाख ८३ हजार ५६७ जणांच्या नमुन्यांच्या चाचण्या झाल्या.


हेही वाचा – Lockdown: पुन्हा लॉकडाऊन! नवीन कोरोनाच्या लाटेमुळे देशाचा निर्णय