Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वात मोठी घट! १ लाखांपेक्षा कमी...

India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वात मोठी घट! १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज देखील देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिलासादायकबाब म्हणजे ६३ दिवसांनंतर १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ८६ हजार ४९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ हजार १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ८२ हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८९ लाख ९६ हजार ४७३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७३ लाख ४१ हजार ४६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या १३ लाख ३ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३ कोटी ६१ लाख ९८ हजार ७२६ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

देशात ७ जूनपर्यंत ३६ कोटी ८२ लाख ७ हजार ५९६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १८ लाख ७३ हजार ४८५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ४३ लाख ७० हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ७६ लाख २० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Covid-19 विषाणूच्या उगमाबाबत चीनला अधिक माहिती देण्यास भाग पाडू शकत नाही – WHO


- Advertisement -