घरदेश-विदेशभारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक? पाहा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल!

भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक? पाहा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल!

Subscribe

चीन याआधी सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जात असे. परंतु सयुंक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारताची अवस्था बिकट झाल्याचे दिसत आहे.

भारत लोकसंख्येच्या बाबातीत चीनलाही मागे टाकणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राने लावला आहे. भारताची लोकसंख्या २०२७ पर्यंत इतर देशांपेक्षा अधिक होणार, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या ‘द वर्ल्ड पॉपुलेशन’ विभागाने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात भारत २०५०पर्यंत अधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. भारत लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीनलाही मागे टाकणार आहे. भारताच्या लोकसंख्येत २०५० पर्यंत २७.३ कोटीने वाढ होऊ शकते. सयुंक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील लोकसंख्येत २ अरब इतक्या लोकसंख्येने वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरात २०५० पर्यंत लोकसंख्येचा आकडा ७.७ ते ९.७ अरबपर्यंत पोहचण्याचा अंदाज लावला जात आहे. या अहवालाच्या यादीत भारत अव्वल आहे. भारतानंतर अधिक लोकसंख्येच्या यादीत नाइजीरिया, पाकिस्तान, इथियोपिया, टांझानिया, मिस्त्र, इंडोनेशिया आणि अमेरिका यांचा समावेश होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 २०११ मधील लोकसंख्येचा अहवाल

भारताची १५ वी जनगणना करण्यात आली होती. त्याचा प्राथमिक अहवाल जनगणना आयुक्त सी. चंद्रमौली यांनी जाहीर केला होता. २००१ ते २०११ या दहा वर्षांत भारतीय लोकसंख्येत १८ कोटींची वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. १९९१ ते २००१ या दरम्यान जनगणनेत लोकसंख्यावाढीचा दर २१.१५ टक्के होता, तो २०११मध्ये १७.६४ टक्क्यांवर आला होता. सातत्याने वाढत चाललेल्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. जनगणना २०११च्या अहवालानुसार, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही भारताची लोकसंख्या जास्त असल्याचे आढळले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -