घरताज्या घडामोडीCoronavirus: जून अखेरपर्यंत भारतात दररोज २ लाख कोरोना चाचण्या होतील!

Coronavirus: जून अखेरपर्यंत भारतात दररोज २ लाख कोरोना चाचण्या होतील!

Subscribe

देशातील ९०१ लॅबपैकी ६५३ लॅब सरकारी आहेत.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगाने वाढताना दिसत आहे. दरम्यान देशात कोरोना व्हायरस चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या वाढून ९०१ झाली आहे. लवकरच लॅबची संख्या एक हजार करण्याचे लक्ष्य आहे. इंडियान काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील ५३४ लॅबमध्ये आरटी-पीसीआर, २९६ मध्ये ट्रूनेट आणि ७१ लॅबमध्ये सीबी नॅट तंत्रज्ञानाच्या आधारे कोविड-१९ नमुन्यांची चाचणी होत आहे. ९०१ लॅबपैकी ६५३ लॅब सरकारी आहेत.

पुढे त्यांनी सांगितले की, लवकरच देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना व्हायरस चाचणी करण्याची सुविधा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. आता १५० लॅबना मंजूरी देणे बाकी आहे. या लॅबमध्ये सुविधांचा आढावा घेतला जात आहे. त्याशिवाय जून महिन्या अखेरपर्यंत आरोग्य मंत्रालयाने दररोज २ लाख नमुन्यांच्या चाचण्या करण्याचे लक्ष्य दिले आहे. याच पार्श्वभूमीवर दररोज १.५५ लाख नमुन्यांच्या चाचण्या होत आहे. पुढील दोन आठवड्यात दररोज २ लाखांहून अधिक नमुन्यांच्या चाचण्या केल्या जातीस.

- Advertisement -

कोविड इंडिया ट्रॅकरच्या आकेडवारीनुसार, आतापर्यंत देशात ३ लाख ४३ हजार ७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ९ हजार ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७७६ रुग्ण अॅक्टिव्ह असून १ लाख ८० हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाख पार तर ४० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -