Indian Militaryच्या लढाऊ विमानांमध्ये अस्त्र Mk-I क्षेपणास्त्रे बसवली जाणार, २९७१ कोटींचा करार

आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत, संरक्षण मंत्रालयाने २९७१ कोटी रूपये खर्च करून भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलासाठी अस्त्र Mk-I Beyond Visual Range (BVR) Air to Air Missile (AAM) लॉन्च करण्यात आले आहे. संबंधित उपकरणांच्या पुरवठ्यासाठी ३१ मे २०२२ रोजी भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे.

या श्रेणीचे स्वदेशी क्षेपणास्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. अस्त्र Mk-I BVR AAM हे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनद्वारे स्वदेशी डिझाईन आणि विकसित केले गेले आहे. त्यामुळे परदेशी क्षेपणास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल. दृश्य श्रेणीच्या पलीकडे जाऊ जे लक्ष्य दिसत नाही ते लक्ष्य गाठण्यासाठी हे क्षेपणास्त्र उपयुक्त ठरणार आहे.

हल्ला केव्हा आणि कुठून?

BVR क्षमतेसह हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांना उत्तम स्टँड-ऑफ श्रेणी प्रदान करतात. शत्रूला कधीच समजणार नाही की हल्ला केव्हा आणि कुठून होईल. त्यामुळे या हवाई क्षेपणास्त्रांमुळे एक मोठी ताकद मिळते. हे क्षेपणास्त्र तांत्रिक आणि आर्थिकदृष्या अशा अनेक आयात केलेल्या क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा श्रेष्ठ आहे. डीआरडीओने या क्षेपणास्त्राच्या अनेक चाचण्या यशस्वी केल्या आहेत.

सुखोई-३० एमके-आय या लढाऊ विमानात लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट पूर्णपणे फिट करण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल हे विमान क्षेपणास्त्र मिग-२९ के लढाऊ विमानातही बसवण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्रांचे वजन १५४ किलो इतके आहे. तसेच ते १२.६ फूट लांब आहे.

Mk-I BVR AAM क्षेपणास्त्र १५ किलो उच्च-स्फोटक प्री-फ्रेग्मेंटेड वॉरहेड्ससह बसविले जाऊ शकते. त्याची स्ट्राइक रेंज ११० किमी आहे. ते २० किमी उंचीपर्यंत जाऊ शकते.


हेही वाचा :Singer KK Death: प्रसिद्ध गायक के के यांचे निधन, संगीत कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका