Optical Illusion: सुक्या पानांमध्ये दडलाय एक छोटासा जीव, शोधता शोधता अनेकांच्या नाकीनऊ

पहिल्यांदा आपल्याला तो व्यवस्थित पाहावा लागेल. कारण सरडा तुमच्या नजरेसमोर आहे, पण त्याचा आकार एकदम वेगळाच आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सर्वात आधी पाहावे लागेल की, तो कोणत्या पानांच्या आकारासारखा आहे. जर पानांचा आकार पाहिला तर तुम्ही त्याला सहजरीत्या शोधू शकता.

नवी दिल्लीः Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चे फोटो व्हायरल होत असतात. संभ्रमात टाकणारे फोटो पाहून लोक बुचकळ्यात पडतात. कधी कधी पर्सनॅलिटी टेस्ट, तर कधी फोटोत प्राण्यांना शोधणं, असे अनेक प्रकारचे फोटो आपल्याला कोड्यात टाकतात, लोकांनाही फोटोमध्ये नेमकं काय आहे हे शोधण्यात रस असतो. त्यामुळेच आता ऑप्टिकल इल्युजनचा ट्रेंड तयार झाला आहे. एक अशाच पद्धतीचा फोटो समोर आलाय, ज्यात एका प्राण्याला शोधायचं आहे.

सुक्या पानांमध्ये लपलाय सरडा

गेल्या काही दिवसांपूर्वी ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमधून पानांमधून साप शोधण्यात आला होता. अशाच पद्धतीचा आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यात आपल्याला वाळलेल्या पानांमधून सरड्याला शोधायचं आहे. एका फोटोमध्ये आपल्याला पानांमध्ये एक जीव दिसेल, परंतु पहिल्यांदा आपल्याला तो व्यवस्थित पाहावा लागेल. कारण सरडा तुमच्या नजरेसमोर आहे, पण त्याचा आकार एकदम वेगळाच आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सर्वात आधी पाहावे लागेल की, तो कोणत्या पानांच्या आकारासारखा आहे. जर पानांचा आकार पाहिला तर तुम्ही त्याला सहजरीत्या शोधू शकता.

सरड्याला सहज शोधण्यात अनेकांना अपयश

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोकडे तुम्ही नीट पाहिलेत तर फोटोमध्ये एक सरडा लपलेला पाहायला मिळेल. जसं तुम्ही ऐकलंय, तसाच सरड्यानं रंग बदललेला आहे. तशाच पद्धतीने जर तुम्हाला सरडा दिसला असेल तर त्याचं तोंड आणि हात एकदम सुक्या पानांच्या रंगाचे आहेत. इंटरनेटवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हा फोटो पाहून हैराण आहेत, सरड्यानं कशा पद्धतीनं रंग बदलला.
Optical Illusion


हेही वाचाः “हौसेला मोल नाही!”…..कुत्रा बनण्यासाठी केला तब्बल ११ लाखांचा खर्च