Indian Army : सॅल्यूट! काश्मीरच्या बर्फवृष्टीतही गर्भवती महिलेला जवानांची मदत, व्हिडिओ व्हायरल

जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या जोरदार बर्षवृष्टीमुळे येथील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांना बर्फाळ रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. परंतु जोरदार बर्फवृष्टीतून भारतीय जवानांनी गर्भवती महिलेला रूग्णालयात नेण्यास मदत केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय सैन्य देशाच्या सीमेवरील रक्षण करण्यासोबतच गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी सदैव पुढे असतात. ही घटना शोपिया येथील रामनगरी येथे घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. एका गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे स्थानिक लोकांनी तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याची विनंती केली होती. महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे सेनेला आपात्कालीन कॉल करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच सेना घटनास्थळी दाखल झाली.

महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला आपात्कालीन स्थितीतून बाहेर काढण्यासाठी भारतीय सैनिकांकडून नियोजन करण्यात आलं. बर्फवृष्टीमुळे वाहन चालवणं अतिशय कठीण होतं. त्यामुळे भारतीय सैनिकांनी महिलेला स्ट्रेचरच्या मदतीने खांद्यावरून रूग्णालयात नेण्यात आलं. ६.५ किलोमीटरपर्यंत पायपीट केल्यानंतर महिलेला पुढे रूग्णवाहिकेतून सार्वजनिक आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आलं आहे.


हेही वाचा : मुंबईच्या सांस्कृतिक ठेव्याच्या साक्षीदाराची सेंच्युरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे १००व्या वर्षात पदार्पण