PF withdrawal : Medical Emergency मध्ये PF चे पैसे १ तासात करा ट्रान्सफर, जाणून घ्या प्रक्रिया

medical emergency online money transfer

कोरोनाच्या महामारीत प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या तरी चिंतेने हैराण आहे. नोकरादार वर्गापासून ते प्रत्येक वर्गातील व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा विषय भेडसावतो आहे. अनेकदा अशाच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैशांची जुळवाजुळव करणे अतिशय आव्हानात्मक होऊन जाते. पण यापुढे अशी चिंता भेडसावण्याचे कारण नाही, कारण सरकारनेच अशा आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठीची मुभा दिला आहे. सरकारने वैद्यकीय मदतीसाठी काही नियम शिथिल केले आहेत. तुम्ही नोकरदार असाल तर प्रत्येक महिन्याच्या पगारातून काही पैसे हे पीएफच्या रूपात कापले जातात. हे पैसे पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा केले जातात. कर्मचारी आणि मालक वर्ग पगाराच्या रकमेच्या १० टक्के रक्कम ही पीएफच्या रूपात जमा करतात. हीच पीएफची रक्कम मेडिकल एमर्जन्सीमध्ये अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात जमा होण्याचा सोपा पर्याय आहे.

एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातील १ लाख रूपये हे मेडिकल एडव्हान्सच्या रूपात काढण्याची सुविधा सरकारने दिली आहे. कोणत्याही मेडिकल एमर्जन्सीमध्ये जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते तेव्हा या खर्चासाठी पीएफची रक्कम काढता येते. पहिल्यांदा मेडिकल बिल सादर केल्यानंतरच ही रक्कम मिळत होती. आता ही सुविधा मेडिकलची बिले जमा केल्याशिवायच मिळते. ही रक्कम कशा पद्धतीने क्लेम करून काढता येतात हे जाणुयात.

आपत्कालीन स्थितीत PF चे पैसे कसे काढाल ?

– पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर जाऊन आपला UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर मॅनेज टॅबवर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करा.
– KYC वेरिफिकेशन नंतर online service टॅबवर जाऊन Claim(Form-31,19 & 10C) या पर्यायाची निवड करा. तुमच्या स्क्रिनवर KYC, नोंदणी यासारख्या सुविधा दिसतील. त्यामध्ये आपल्या बॅंकेच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या ४ क्रमांकाचा समावेश करावा लागेल. त्यानंतर YES हा पर्याय क्लिक करा.
– प्रमाणपत्र स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला Proceed for Online Claim क्लिक करावे लागेल. त्यानंतर एका ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल. त्यामध्ये एमर्जन्सी मेडिकल ऑप्शन क्लिक करावा लागेल.
– या पर्यायाअंतर्गत तुम्हाला पैशांची आवश्यकता, चेकची स्कॅन कॉपी, तुमचा पूर्ण पत्ता ही माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला Get Aadhar OTP हा पर्याय क्लिक करावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. हा ओटीपी तुम्हाला सबमिट करावा लागेल.
– त्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये क्लेम केलेले पैसे हे १ तासामध्ये उपलब्ध होतील.