घरदेश-विदेशतीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये संघर्ष; भारत-चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट

तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये संघर्ष; भारत-चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट

Subscribe

पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा केला प्रयत्न

उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला या सीमेवर भारत आणि चीनच्या जवानांमध्ये संघर्ष झाला आहे. भारत आणि चीनमधील सातत्याने वाढणाऱ्या तणावादरम्यान, तीन दिवसांपूर्वी उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला या सीमेवर भारत आणि चीनच्या दोन सैन्यांमध्ये झटापट झाली असल्याची माहिती मिळतेय. तर चीनची सीमा ही काश्मीरपासून अरूणाचल प्रदेशसह सिक्कीमपर्यंत भारताला लागून आहे. याप्रदेशातील उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला या सीमेवर भारत-चीनच्या सैन्यात ही झडप झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या गस्त घालणाऱ्या पथकांनी भारतीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चीन आणि भारतीय जवानांमध्ये हा वाद झाला. चीनी जवान भारतीय सीमा पार करत असताना भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला या सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. भारत आणि चीनमधील जवानांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये कोणत्या प्रकारची हिंसा झाली आहे की नाही, याची अधिकृत घोषणा किंवा लष्कारचे अधिकृत विधान समोर आलेले नाही. परंतु, या झालेल्या झटापटीमध्ये भारत आणि चीनचे काही सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात गलवान खोऱ्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. मात्र तेव्हा देखील लष्कराकडून अधिकृत माहिती आलेली नव्हती. त्याप्रकारेच उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला या सीमेवर झालेली ही घटना आहे.

- Advertisement -

४ भारतीय आणि २० चीनी सैनिक जखमी

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झडप झाली, ज्यामध्ये ४ भारतीय आणि २० चीनी सैनिक जखमी झाले आहेत अशी माहिती मिळते. दरम्यान, अजूनही या भागात तणाव कायम आहे, मात्र स्थिर आहे. भारतीय सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, की हिंदुस्थानच्या लष्कराकडून या भागातील सर्व प्वॉइंटवर खराब वातावरण असताना देखील सैन्याचा कडक पहारा आहे. चीनच्या सैनिकांनी एलएसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चीनच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर चिनी सैनिक येत होते. भारतीय सैनिकांनी त्यांना रोखले असता ही झटापट झाली. नेहमीच सीमेवर ताण-तणावाचे वातावरण असते आणि हाच तणाव कमी करण्यासाठी रविवारी भारत-चीन यांच्यात साधारण १५ तास बैठक झाली. लडाखच्या मोल्डोमध्ये दोन्हा देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये ९ व्या फेरीतील बैठक झाली. या बैठकीतील निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मात्र, एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठीच ही बैठक झाल्याचे समजते. भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आज तक, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -