पॉर्न पाहणं पडणार महागात, प्रसिद्ध वेबसाईटचा डेटा लीक

Popular Porn Website myfreecams user data leak by hackers
'या' प्रसिद्ध वेबसाईटवर पॉर्न पाहताय तर सावधान!

पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पॉर्न पाहण्यासाठी अनेक वेबसाईट आहे. पण आता एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटचा डेटा हॅकर्सने लिक केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या वेबसाईटवरील पॉर्न पाहणाऱ्यांचा खासगी डेटा चोरीला जात असून या माहितीच्या आधारे हॅकर्स ब्लॅकमेल आणि पैसे उकळण्याची शक्यता आहे. तसेच या खासगी डेटा असल्यामुळे हॅकर्स कोणत्याही थराला जाऊ शकतात. या प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटवर हॅकर्सचा हल्ला झाल्यामुळे चिंता वाढली आहे. याबाबतचे वृत्त सायबर न्यूज दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वेबसाईटवरील जवळपास २० लाख युजरचा खासगी डेटा चोरीला गेला आहे. या खासगी डेटामध्ये युजरचे नाव, ई-मेला आयडी, पासवर्ड, आयपी Address, त्यांनी सर्च केलेल्या इतर गोष्टी याचा समावेश आहे. युजरचा हा खासगी डेटा वापरून ब्लॅक मार्केटमध्ये विकला जात आहे. तसेच या बदल्यात बिटकॉईनची मागणी केली जात आहे. १५०० डॉलरचे बिटकॉईन १० हजार युजरसाठी मागितले जात आहेत. या १० हजार युजरचा डेटा विकत घेऊन कमीत कमी १० हजार डॉलरची कमाई केली जाऊ शकतो. या वेबसाईटवरील चोरी केलेली माहिती एक प्रसिद्ध फोरमला विकली जाणार आहे. हॅकर्स युजरच्या खासगी डेटाचा कोणत्याही प्रकारे वापर करू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या वेबसाईटला महिन्याला सात कोटी युजर भेट देतात. पॉप्युलर अॅडल्ट वेबसाईटच्या यादीमध्ये ही वेबसाईट २७ व्या क्रमांकावर आहे. दरम्यान या वेबसाईटवरील डेटा लिंक झाल्याचे वृत्त जेव्हा सर्वत्र पसरले तेव्हा या वेबसाईटने असे स्पष्ट केले की, ‘वेबसाईटच्या युजर्सना पासवर्ड बदलण्याची सूचना देण्यात आली आहे.’


हेही वाचा – ‘पॉर्न’ पाहून तरुणाने केला ६० वर्षाच्या विधवा महिलेवर बलात्कार