घरदेश-विदेशराहुल गांधींना तात्काळ राष्ट्रीय अध्यक्ष करा; दिल्ली काँग्रेसचा ठराव

राहुल गांधींना तात्काळ राष्ट्रीय अध्यक्ष करा; दिल्ली काँग्रेसचा ठराव

Subscribe

कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांना तातडीने राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्याचा ठराव दिल्ली कॉंग्रेसने संमत केला आहे. दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी रविवारी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक महत्वाची बैठक बोलावली. त्यामध्ये कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील धोरणांवर आवश्यक चर्चा करण्यात आल्या. दरम्यान, जून २०२१ पर्यंत राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल, असं काँग्रेस पक्षाकडून नुकतचं जाहीर करण्यात आलं होतं.

या बैठकीत तीन ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. राहुल गांधींना कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंग गोहिल यांनी निवेदनात म्हटलं आहे की, दिल्लीत पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित काम करावं लागेल.

- Advertisement -

तथापि, पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्ली प्रदेश आणि देशाच्या सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी राज्य कार्यालय राजीव भवन येथे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. बैठकीस उपस्थित नेत्यांनी तीन प्रमुख ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये राहुल गांधी यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष बनविण्याचा प्रस्ताव होता. त्याचसोबत या प्रस्तावांमध्ये २६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान घडलेला हिंसाचार आणि दिल्लीची वर्तमान स्थितीला गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जबाबदार ठरवत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्याला काँग्रेस कार्यकारिणीनं मंजुरी दिली आहे. कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भुपिंदर हुडा, पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी आणि मुकुल वासनिक यांचा यामध्ये समावेश होता.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार खूप अनुभवी, पण कृषी कायद्यांबाबत त्यांची दिशाभूल – कृषीमंत्री तोमर


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -