घरदेश-विदेशशिकार प्रकरणी गोल्फर ज्योति रंधावाला अटक

शिकार प्रकरणी गोल्फर ज्योति रंधावाला अटक

Subscribe

प्रसिद्ध गोल्फर आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा पूर्व पती ज्योति रंधावा याला शिकारी प्रकरणी अटक करण्यात आले आहे. रंधावा याच्या गाडीतून २२ बंदूका जप्त करण्यात आल्या आहेत.

प्रसिद्ध आंतराष्ट्रीय गोल्फर आणि बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा पूर्वपती ज्योति रंधावा (४६) याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश येथील वनअधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील बहराई परिसरात शिकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही अटक करण्यात आली असल्याची समोर आली आहे. त्याच्या जवळून २२ बंदूका जप्त केल्या गेल्या आहेत. २००४ ते २००९ दरम्यान रंधावा हा जगातील १०० गोल्फरच्या यादीत ४६ व्या क्रमांकावर होता. रवांधाने आशियाई टूर मनी यादीत सर्वोच्च स्थान पटकावले होते. तर २००४ मध्ये युरोप टूर दरम्यान जॉनी वॉकर क्लासिकमध्येही उत्तम कामगिरी केली होती.

- Advertisement -

शस्त्रे पोलिसांनी केली जप्त

कतरनी घाट येथे मोतीलापूर परिसरात रंधावाला अटक करण्यात आले. वनअधिकारी रमेश कुमार पांडे यांनी त्याला अटक केली आहे. रवांधाची गाडी तपासल्यानंतर त्यातून बंदूका जप्त करण्यात आल्या आहेत. या परिसरात प्राण्यांची शिकार करण्यासाठी रंधावा आला होता असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -