घरताज्या घडामोडीबिहारमध्ये दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

बिहारमध्ये दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

Subscribe

बिहारमध्ये दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील पंडोल येथून लोहट साखर कारखान्याकडे गेलेल्या रेल्वेमार्गात चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे रुळ चोरल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील पंडोल येथून लोहट साखर कारखान्याकडे गेलेल्या रेल्वेमार्गात चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे रुळ चोरल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेने या प्रकरणी झंझारपूरच्या आऊटपोस्टचे प्रभारी आणि मधुबनीच्या जमादाराला निलंबित केले आहे. (Indian Railway in Bihar A lot of railway tracks were stolen)

दोन किलोमीटरचा रेल्वे रुळ चोरीला गेल्याप्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. रेल्वे व्हिजिलेंस (सीआयबी) आणि आरपीएफची टीम यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरपीएफने दरभंगामध्ये रेल्वे मार्ग चोरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, समस्तीपूर रेल्वे विभागातील पंडोल स्टेशनमधून लोहट साखर कारखान्यासाठी अनेक वर्षांपूर्वी पूर्व मध्य रेल्वेने लोहमार्ग बांधण्यात आला होता. हा साखर कारखराना बंद झाल्यानंतर या मार्गावरून रेल्वे गाड्यांची ये-जा बंद झाली होती. या रेल्वे मार्गाचे स्क्रॅप म्हणून लिलाव करण्यात येणार होते. मात्र या लिलावापूर्वीच पंडोल स्टेशनवरून लोहट साखर कारखान्यापर्यंत जाणारा दोन किमीपर्यंतचा मार्ग चोरी झाला आहे.

काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी कटकारस्थान रचून रेल्वे मार्गावरील स्क्रॅप गायब केल्याचा आरोप लोकांनी केला आहे. याप्रकरणाच्या प्राथमिक तपासणीनंतर आरपीएफ कमांडेंट एसजे ए जानी यांनी झंझारपूर स्टेशनचे आऊटपोस्ट प्रभारी श्रीनिवास आणि मधुबनी स्टेशनवर तैनात असलेले आरपीएफ जमादार मुकेश कुमार सिंह यांना निलंबित केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुर्की, सीरियातील भूकंपात १६२१ जणांचा मृत्यू; दिवसभरात बसले दोन धक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -