घरदेश-विदेशभारतीयांचा दावा फोल, स्वीसमध्ये काळ्या पैशात ५० टक्क्यांनी वाढ

भारतीयांचा दावा फोल, स्वीसमध्ये काळ्या पैशात ५० टक्क्यांनी वाढ

Subscribe

स्वीस बँकेतील काळा पैसा भारतात परत आणणार याच जोरावर भाजपा सरकारने आपली सत्ता भारतात आणली. मात्र सरकारचा हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. भारतीय लोकांचे स्वीस बँकेतील काळा पैसा गेल्या चार वर्षात पहिल्यापेक्षा ५० टक्क्यांनी वाढला आहे.

भारतीय लोकांचे स्वीस बँकेतील काळा पैसा गेल्या चार वर्षात पहिल्यापेक्षा वाढून एक अब्ज स्वीस फँक (७ हजार कोटी रुपये) इतका झाला आहे. अर्थात हा पैसा पहिल्या पैशाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेच्या ताज्या आकड्यांनुसार ही बाब समोर आली आहे. या आकड्यांनुसार, भारतीय लोकांद्वारे स्वीस बँकेच्या खात्यात ठेवण्यात आलेले धन २०१७ मधील पैशापेक्षा ५० टक्क्यांनी वाढून १.०१ अब्ज फ्रँक इतके झाले आहे. यापूर्वी तीन वर्ष सतत तिथल्या बँकांमध्ये भारतीय लोकांच्या खात्यात कमतरता आली होती. आपल्या बँकेची गोपनीयता ठेवणाऱ्या बँकेमध्ये भारतीयांच्या काळ्या पैशाची वाढ ही चिंतात्मक बाब असून भारतातील सरकार विदेशात ठेवलेल्या काळा पैशाच्या विरोधात अभियान करूनच जिंकून आलं होतं ही आश्चर्याची बाब आता समोर येत आहे.

स्वीस बँकेतील काळा पैसा

स्वीस बँकेतील काळा पैसा भारतात परत आणणार याच जोरावर भाजपा सरकारने आपली सत्ता भारतात आणली. मात्र सरकारचा हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. स्वीस नॅशनल बँक (एसएनबी) च्या वार्षिक आकडेवारीनुसार, स्वीस बँकेतील खात्यात जमा असलेला भारतीय पैसा हे २०१६ मध्ये ४५ टक्क्यांनी कमी होऊन ६७.६ कोटी फ्रँक (साधारण ४५०० कोटी रुपये) इतका राहिला होता. तर १९८७ मध्ये याची संख्या फारच कमी होती. एसएनबीच्या आकड्यांनुसार, भारतीयांनी स्वीस बँक खात्यात सरळमार्गी ठेवण्यात आलेली मत्ता ही २०१७ मध्ये ६८९१ कोटी रुपये (९९.९ कोटी फ्रँक) होती. तर, प्रतिनिधीद्वारे ठेवण्यात आलेली रक्कम ही ११२ कोटी रुपये (१.६२ कोटी फ्रँक) होती. ताज्या आकडेवारीनुसार, ग्राहकांद्वारे जमा केलेली रक्कम ही ३२०० कोटी रुपये असून अन्य बँकांद्वारे जमा करण्यात आलेली रक्कम ही १०५० कोटी आहे. २०११ मध्ये १२ टक्के, २०१३ मध्ये ४३ टक्के तर २०१७ मध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. तर २००४ मध्ये या रकमेत ५६ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळं सरकारचा दावा पूर्णतः फोल ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -