घरदेश-विदेशभारत-चीन तणाव: आज भारत-चीन सैन्यात कमांडर पातळीवर चीनच्या भूमीत चर्चा

भारत-चीन तणाव: आज भारत-चीन सैन्यात कमांडर पातळीवर चीनच्या भूमीत चर्चा

Subscribe

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताण कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात पुन्हा कमांडर-स्तरीय बैठक होणार आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक मोल्दो येथील चुशुलसमोर चिनच्या भागात होईल. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी बर्‍याच चर्चा झाल्या आहेत, ज्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

जशास तसे उत्तर देण्याचे आदेश

भारताने चीनलगतच्या सुमारे ३५०० किलोमीटर सीमारेषेलगत सैन्य तैनात केले असून चीनच्या कोणत्याही दुष्कृत्याला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले आहेत. रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्करांच्या प्रमुखांसोबत चर्चा करून पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर पूर्णत: सज्ज असून चीनने पुन्हा आगळीक केली तर चिन्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा – व्यावसायिक अभ्यासक्रम, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो सरकार आपल्या सोबत – उदय सामंत


या बैठकीला भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग, वायू दलप्रमुख आर. के. एस. बदुरिया उपस्थित होते. राजनाथ सिंग सोमवारी रशिया दौर्‍यासाठी जाणार असून त्याआधी ही भेट घेण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सर्व प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसेच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यात सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -