वृत्तवाहिन्यांचा पुन्हा टीआरपी सुरू होणार; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे बार्कला आदेश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तत्काळ रेटिंग सुरू करण्याचे आदेश बार्कला दिले आहेत.

information and broadcasting ministry BARC to resume TV ratings for news channels
वृत्तवाहिन्यांचा पुन्हा टीआरपी सुरू होणार; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे बार्कला आदेश

गेल्या काही महिन्यांपासून देशातील वृत्तवाहिन्यांचे टीआरपी बंद होते. मात्र आता वृत्तवाहिन्यांचे टीआरपी सुरू होणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बार्कला त्यासंदर्भात आदेश दिले आहेत. वृत्तवाहिन्यांचे टीआरपी तत्काळ जाहीर करण्यास सांगितले आहे. तसेच मागील तीन महिन्यांचा डेटा देखील जारी करण्यास सांगितला आहे.

माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी टीआरपीसंदर्भात जी केस उघड केली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२०पासून वृत्तवाहिन्यांची टीआरपी येत नव्हते. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बार्कला आदेश दिले आहेत की, तत्काळ हे टीआरपी जाहीर करा. यापुढे दर चार आठवड्याची रेटिंग त्याची सरासरी काढून वृत्तवाहिन्यांचे टीआरपी दिले जाणार आहे. यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून बार्कची टेक्निकल कमिटी आणि इतर कमिटी काम करत होते.

या वृत्तवाहिन्यांमधील टीआरपीमध्ये कोणतीही छेडछाड होणार नाही यासाठी फूल प्रुफ सिस्टम बार्कने तयार केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर टेक्निकल कमिटीचा अहवाल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दाखवण्यात आला. मग यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बार्कला रेटिंग जारी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात पूर्ण रेटिंगवर नजर ठेवण्यासाठी पर्मंट ओव्हरोल कमिटी स्थापन केली आहे. तत्काळ रेटिंग सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे उद्यापासून याची सुरुवात होणार आहे. एका आठवड्या ऐवजी चार आठवड्याची रेटिंग जाहीर केली जाणार आहे.


हेही वाचा – Amazon Appवर १० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; काय आहे प्रक्रिया?